RCB will be Sold: IPL चॅम्पियन बनताच आरसीबीचा वाईट काळ सुरू; मालकी कंपनी Diageo Plc संघातील आपला हिस्सा विकण्याच्या विचारात
संघाची मालकी कंपनी डियाजियो पीएलसी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघातील आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.
RCB will be Sold: आयपीएल 2025 च्या हंगामात देशाला नवा आयपीएल विजेता मिळाला. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नवीन मालकाच्या हाती जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघाची मालकी कंपनी डियाजियो पीएलसी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघातील आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात ही खळबळ उडवूव देणारी माहिती समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग ही भारताची क्रिकेटची नवी ओळख आहे. क्रिकेटसह ग्लॅमर, पैसा आणि आवड यांचा एक अनोखा संगम आयपीएल आहे.
दरवर्षी ही लीग कोट्यवधी हृदयांची धडकन बनते. खेळाडूंना एका रात्रीत स्टार बनवते आणि फ्रँचायझींना अब्जावधींचा महसूल मिळवून देते. अशा परिस्थितीत, आयपीएलचे पहिले-वहिले विजेतेपद जिंकून इतिहास रचणा-या आरसीबीच्या भविष्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आल्याने संपूर्ण क्रिकेट जगतात भूकंप झाला आहे. हा संभाव्य करार, जर पूर्ण झाला, तर आरसीबीचे मूल्य 17,000 कोटी रुपये, म्हणजेच 2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवू शकतो. यासह ही फ्रँचायझी क्रीडा जगतातील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक बनेल.
ब्लूमबर्गच्या अहवालाने या खेळाच्या व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चेमागे अनेक गुंतागुंतीची कारणे आहेत. जी केवळ व्यावसायिकच नाहीत. तर, नियामक आणि सामाजिक दबावांशीही संबंधित आहेत. भारताचे आरोग्य मंत्रालय आयपीएलमध्ये तंबाखू आणि अल्कोहोल ब्रँडच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असताना ही चर्चा होत आहे. आरोग्य मंत्रालय क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना अप्रत्यक्षपणे इतर अस्वास्थ्यकर उत्पादनांचा प्रचार करण्यापासून रोखायचे आहे. आरोग्य मंत्रालय आयपीएलमध्ये तंबाखू आणि मद्य ब्रँडच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रचारावर कठोर निर्बंध लादण्यावर भर देत आहे. यासोबतच, क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींकडून अशा ‘अस्वास्थ्यकर उत्पादनांच्या’ अप्रत्यक्ष प्रचाराला रोखण्याच्याही नियमावली आखली जात आहे.
भारतात मद्य आणि तंबाखू उत्पादनांची थेट जाहिरात प्रतिबंधित आहे. परंतु डियाजिओसारख्या कंपन्यांनी या नियमांमधून पळवाट काढण्यासाठी ‘सरोगेट जाहिरातींचा’ आधार घेतला आहे. ज्यासाठी ते विराट कोहलीसारख्या अव्वल क्रिकेटपटूंचा वापर करतात.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

