Ravi Shastri Birthday Special: रवि शास्त्री यांचे 'या' तीन अभिनेत्रींसोबत जोडले गेले नाव, रंगल्या अफेअरच्या चर्चा; पण वास्तवात काय घडले? जाणून घ्या प्रेम कहाणी

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यादिवशी आपण बर्थडे-बॉय रवि शास्त्री आणि 3 बॉलीवूड अभिनेत्रींसोबत त्यांच्या रंगलेल्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. 1980 मध्ये टीम इंडियाचे ‘पोस्टर बॉय’ शास्त्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहच्या प्रेम प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रवि शास्त्री व अमृता सिंह (Photo Credit: Twitter)

Ravi Shastri Birthday Special: बॉलीवूडमध्ये (Bollywood) लिंक-अप आणि ब्रेक-अप सामान्य बाब आहे. तसेच खेळाडू आणि बॉलीवूड अभिनेत्रींमधील प्रेमकहाणीची चर्चा गेल्या अनेक दशकांपासून होत आहेत. बॉलिवूडच्या जगात अशा अनेक प्रेमकहाणी आहेत ज्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत पण आजही त्या लोकांच्या आठवणीत राहिल्या आहेत आणि यामध्ये भारतीय संघाचे (Indian Team) माजी कर्णधार आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांचेही नाव सामील आहे. शास्त्री आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यादिवशी आपण बर्थडे-बॉय रवि शास्त्री आणि 3 बॉलीवूड अभिनेत्रींसोबत त्यांच्या रंगलेल्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. (T20 वर्ल्ड कप 2021 नंतर पुन्हा सुरु होणार टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची शोध, Ravi Shastri यांना भारताचे ‘हे’ 3 माजी दिग्गज करू शकतात रिप्लेस)

1980 मध्ये टीम इंडियाचे ‘पोस्टर बॉय’ शास्त्री आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहच्या (Amrita Singh) प्रेम प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माध्यमांच्या काही वृत्तांनुसार, दोघेही आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर होते आणि त्यांची लग्न करण्याची इच्छाही होती. परंतु त्यांचे संबंध लग्नाच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी माध्यमात पसरली. सामन्यादरम्यान शास्त्रींना चिअर करण्यासाठी अमृता स्टेडियममध्ये जायची पण जेव्हा दोघे एका मॅगझिनच्या मुखपृष्ठावर एकत्र दिसले तेव्हा दोघांची एकत्रित असल्याच्या चर्चेने जोर धरला. काही काळ डेटिंगनंतर या दोघांचा 1986 मध्ये साखरपुडाही झाला परंतु दोघांचे नातं लग्नाचे रूप घेऊ शकले नाही. अहवालानुसार, शास्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “मला अभिनेत्रीशी लग्न करायचे नाही. माझ्या पत्नीची पहिली प्राथमिकता तिची कारकीर्द नसावी, तर माझे कुटुंब असावे.”

त्यानंतर शास्त्रीने 1990 मध्ये रितु सिंगशी (Ritu Singh) लग्नगाठ बांधली आणि 1991 मध्ये अमृताने बॉलीवूडचा छोटा नवाब सैफ अली खानशी आपला संसार थाटला. परंतु लग्नानंतरही डिंपल कपाडिया आणि नंतर निमरत कौर यांसारख्या सेलिब्रिटींबरोबर शास्त्री यांच्या नावाची चर्चा रंगली होती परंतु त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे कधीच समोर आले नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement