New Zealand दौऱ्यावर Pakistan संघाला कोरोना प्रोटोकॉल तोडणं पडलं महागात, पाकिस्तान टीमचा आठवा सदस्य COVID-19 पॉसिटीव्ह
न्यूझीलंडमधील पाकिस्तान क्रिकेट संघाचा आठवा सदस्य कोविड-19 असल्याचे आढळून आला आहे, बुधवारी न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने आपल्या कोरोना व्हायरस प्रकरणांवरील दैनिक बुलेटिनमध्ये पुष्टी केली.
न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यासाठी Kiwi देशात पोहचलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या (Pakistan Cricket Team) डोकेदुखीत वाढ होत आहे. न्यूझीलंडमधील पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघाचा आठवा सदस्य कोविड-19 (COVID-19) असल्याचे आढळून आला आहे आणि यापूर्वी निदान झालेल्या सात साथीदारांसह क्वारंटाइन सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात येळ. बुधवारी न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने आपल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रकरणांवरील दैनिक बुलेटिनमध्ये पुष्टी केली. गेल्या आठवड्यात न्यूझीलंडमध्ये पहिल्या आठवड्यात पाकिस्तानच्या-53 बळकट संघातील पहिले सहा पॉसिटीव्ह प्रकरणं समोर अली आणि त्यानंतर सातवा त्वरित समोर आला. तेव्हापासून खेळाडू आणि अधिकाऱ्यांची 14-दिवसांच्या व्यवस्थापित क्वारंटाइनच्या तिसर्या आणि सहाव्या दिवशी टेस्ट केली गेली. जेव्हा क्रिस्टचर्च (Christchurch) हॉटेलमध्ये पहिल्या दिवशी खेळाडूंनी प्रोटोकॉलचा भंग केला तेव्हा क्वारंटाइन कालावधीच्या तिसर्या दिवसापासून सराव करण्यासाठी देण्यात आलेली सूटही रद्द करण्यात आली होती. (NZ vs WI 2020: न्यूझीलंडची पाकिस्तान संघाला चेतावणी, Quarantine नियम मोडल्यास घर परत पाठवू; शोएब अखेरने NZC ला सुनावलं)
संघाच्या सदस्यांना "बबल" मध्ये प्रशिक्षण घेण्यापूर्वी त्यांना पहिल्या तीन दिवस त्यांच्या स्वत:च्या खोल्यांमध्ये घालवणे आवश्यक होते. हॉटेलमधील क्लोज सर्किट टेलिव्हिजनने कॉरिडॉरमध्ये मिसळत असलेले आणि जेवण सामायिक करणारे खेळाडूंचे छायाचित्र टिपले ज्यामुळे प्रशिक्षणाची सूट काढून घेतली गेली. हॉटेलमधील क्लोज सर्किट टेलिव्हिजनने कॉरिडॉरमध्ये मिसळत असलेले आणि जेवण शेअर करणारे खेळाडूंचे फोटो टिपले ज्यामुळे प्रशिक्षणाची सूट काढून घेण्यात आली. यानंतर संघाला “अंतिम इशारा” देण्यात आला होता ज्यामध्ये कोरोना प्रोटोकॉलचे पुन्हा उल्लंघन झाल्यास न्यूझीलंडमधून हाकलून दिले जाईल असे सांगण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की इशारा देण्याच्या इशारानंतर टीमच्या वर्तनात “लक्षणीय सुधारणा” झाली आहे.
दरम्यान, कॅन्टरबरी प्रांतातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणाचा विशेषाधिकार पूर्ववत करावा की नाही याचा निर्णय घेतील. 18 डिसेंबरपासून यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. त्यानंतर दोन्ही संघ 26 डिसेंबरपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमने-सामने येतील.