Pakistan Cricket: गॅरी कर्स्टन यांच्याकडून पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा, जेसन गिलेस्पी नवे कोच

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर पाकिस्तान संघाला जेसन गिलेस्पी यांच्या रुपात आगामी मालिकांसाठी नवा प्रशिक्षक मिळाला आहे.

Pakistan Cricket: गॅरी कर्स्टन यांच्याकडून पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा, जेसन गिलेस्पी नवे कोच
Photo Credit- X

Pakistan Cricket Team Appointed New Coach After Gary Kirsten Resigned: दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten)यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan cricket)यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाने नुकतेच पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये नवा कर्णधार म्हणून मोहम्मद रिझवानची घोषणा केली. त्यानंतर गॅरी कर्स्टन यांनी काही दिवसातच संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. (Gary Kirsten Likely to Step Down: पाकिस्तान क्रिकेट व्हाइट-बॉल प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पायउतार होण्याची शक्यता)

पाकिस्तान क्रिकेट संघाला काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीला ४ महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यातच, कर्स्टन यांनी राजीनामा दिल्याने आता संघाचे प्रशिक्षक म्हणून कोण जबाबदारी स्वीकारणार असा प्रश्न निर्माण झाला होता. यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत सर्व माहिती जाहीर केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी (28 ऑक्टोबर) माहिती दिली की, व्हाईट बॉल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कर्स्टन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. पाकिस्तानला येत्या काळात ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका खेळायची आहे. यादरम्यान संघाचे प्रशिक्षक कोण असणार हे पीसीबीने जाहीर केले आहे. पाकिस्तानचे कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

गॅरी कर्स्टन यांना 2 वर्षांच्या करारादाखल संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण आता पीसीबी आणि जेसन गिलेस्पी यांच्याशी मतभेदांनंतर कर्स्टन यांनी राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ 2011 मध्ये विश्वविजेता बनला होता. एप्रिल 2024 मध्ये त्यांची पाकिस्तान क्रिकेट संघाने 2 वर्षांसाठी व्हाईट बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2024 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).