Prithvi Shaw: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासोबत सेल्फीवरुन वाद, मुंबई पोलिसांकडून 8 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

या टोळक्याने जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यवसायिकाच्या वाहनाची तोडफोड केली. तसेच, प्रकरण मिटवण्यासाठी या टोळक्याने व्यवसायिकाकडे 50 हजार रुपयांची आर्थिक मागणी केल्याचाही आरोप आहे.

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्यासोबत सेल्फी काढण्यावरुन झालेल्या वादातून तोडफोड केलेप्रकरणी ओशिवारी पोलिसांनी (Oshiwara Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या टोळक्याने जोगेश्वरी पश्चिम परिसरात एका व्यवसायिकाच्या वाहनाची तोडफोड केली. तसेच, प्रकरण मिटवण्यासाठी या टोळक्याने व्यवसायिकाकडे 50 हजार रुपयांची आर्थिक मागणी केल्याचाही आरोप आहे. सांगितले जात आहे की, सदर टोळके क्रिकेटपटू पृत्वी शॉ याच्यासोबत सेल्फी घेऊ इच्छित होते. मात्र, दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यासाठी पृथ्वी शॉ याने नकार दिला. त्यानंतर टोळके चिडले आणि त्यांनी हे कृत्य केले. या प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी (Mumbai Police) आठ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला आहे. (हेही वाचा, IND vs NZ 1st T20: संघातील निवडीबाबत पृथ्वी शॉचे मोठे वक्तव्य, प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याबाबत सांगितली 'ही' गोष्ट (Watch Video))

पृथ्वी शॉ याच्यासोबत आशिष यादव आणि त्यांचे मित्र बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळावर असलेल्या सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. याच वेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर हे तेथे आले. त्यांनी पृथ्वी शॉ याच्यासोबत सेल्फी काण्याचा आग्रह केला. शॉ यानेही सेल्फी काढला. मात्र, हे दोगे पुन्हा पुन्हा सेल्फी काढण्याचा आग्रह करु लागले. या वेळी हॉटेल व्यवस्थापकाने या दोघांना हटकले आणि हॉटेलबाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी आपल्या इतर साथीदारांनाही तेथे बोलावले आणि आशिष यादव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

ट्विट

दरम्यान, आरोपींन केवळ आशिष यादव प्रकरण थांबवले नाही. त्यांनी यादव यांच्या बीएमडब्ल्यू कारचाही पाटलाग केला. यादव यांची कार लोटस पेट्रोल पंपजवळ येताच त्यांनी बेसबॉल स्टीकने बीएमडब्ल्यू कारच्या काचा फोडल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच आशिष यादव यांच्या वाहनचालकाने तातडीने बीएमडब्लू तशाच अवस्थेत ओशिवारा पोलीस स्टेशनसमोर आणली. धक्कादायक म्हणजे पोलीसस्टेशन समोरही आरोपींनी आशिष यांच्यासोबत वाद घातला. या वेळी आरोपींनी हे प्रकरण मिटविण्यासाठी यादव यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif