IND vs ENG Test: मोहम्मद सिराजचा इंग्लंडला इशारा, IPL मधील कामगिरी विसरून कसोटीत थैमान घालणार

परंतु यंदाचे आयपीएलचे सिझन सिराजसाठी फारसे चांगले राहिले नाही आणि आयपीएल 2022 मध्ये त्याला आरसीबीसाठी फक्त 9 विकेट्स घेतल्या .

मोहम्मद सिराज (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या इंग्लड विरुद्धच्या ' स्थगित केलेल्या' पाचव्या कसोटी सामन्यासाठी अतिशय उत्सुक आहे. गेल्या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांमध्ये सिराजने कमालीची कामगिरी करत 14 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजने लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात प्रत्येकी चार फलंदाज बाद केले आणि भारताच्या 151 धावांच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. पण यंदाचे आयपीएलचे सिझन सिराजसाठी अतिशय खराब राहिले असून आयपीएलच्या बऱ्याच सामन्यांमध्ये त्याने खुप रन्स खर्च केले ज्यामुळे आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये त्याला बाहेर बसावे लागले होते. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये सिराज 15 सामन्यांमध्ये 57.11 च्या सरासरीने आणि 10.07 च्या इकॉनॉमी रेटने फक्त 9 विकेट्स घेऊ शकला. (India Tour of England 2022: इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, स्टायलिश अष्टपैलूची मालिकेतून एक्झिट)

''या हंगामात माझ्या गोलंदाजीचा आलेख थोडा खाली आला होता. पण गेल्या दोन हंगामात माझा आलेख उंचावला होता,पण मी गेल्या दोन वर्षात काय केले ते पाहतो आणि ते माझ्या बरोबर घेतो. ''सिराज म्हणाला हे वर्ष माझ्यासाठी वाईट काळ होता,परंतु मी कठोर परिश्रम करून जोरदार पुनरागमन करेन . मी माझ्या क्षमतांवर काम करेल आणि स्वतःवर विश्वास ठेवेन." सिराजच्या मते, पाचवी कसोटी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या संदर्भात ‘अत्यंत महत्त्वाची’ असेल आम्ही 2-1 ने आघाडीवर आहोत. आमच्याकडे आघाडी असल्याने आम्हाला चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. तसेच आम्ही शेवटचा कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी होऊ.

28 वर्षीय सिराजने सांगितले की,भारतीय संघ इंग्लंड इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून 1 जुलैपासून सुरु होणाऱ्या इंग्लड विरुद्धच्या 'स्थगित केलेल्या' पाचव्या कसोटीत चांगली कामगिरी करायची आहे. "या कसोटी सामन्यासाठी माझी जोरदार तयारी सुरु आहे. इंग्लंडमध्ये ड्यूक्स (Duke)चेंडूचा वापर केला जातो. तिथे इंग्लिश परिस्थितीत गोलंदाजी करणे नेहमीच चांगले असते आणि ते गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरते." तसेच इंग्लंड मधील पिच ह्या नेहमी वेगवान गोलंदाजांना मदत करतात त्यामुळे आम्हाला पिच आणि तेथील परिस्थितींचा फायदा होईल असे सिराज म्हणाला.