Mohammad Amir Retirement: पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने क्रिकेटमधून दुसऱ्यांदा घेतली निवृत्ती, सोशल मिडीयावर पोस्टकरून दिली माहिती
त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत 81 विकेट घेतल्या.
Mohammad Amir Retirement: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी 32 वर्षीय आमिरने पुन्हा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इमाद आणि आमिर या वर्षी यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून शेवटचे खेळले होते. (हेही वाचा - SA Beat PAK 2nd T20I 2024 Scorecard: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी, रीझा हेंड्रिक्सने झळकावले शतक)
आमिरने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली
आमिरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एका पोस्टमध्ये लिहिले की, पाकिस्तानसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे ही सन्मानाची गोष्ट आहे, मला माहित आहे की हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की पुढच्या पिढीची जबाबदारी घेणे आणि पाकिस्तान क्रिकेटला पुढे नेणे महत्त्वाचे आहे. नवीन उंची गाठण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
पाहा पोस्ट -
तो म्हणाला, “मी PCB चे आभार मानू इच्छितो की, गेल्या अनेक वर्षांमध्ये नेहमीच आवश्यक असलेला पाठिंबा दिला आणि मी संघाची कामगिरी पाहण्यास उत्सुक आहे आणि माझ्या कारकिर्दीत मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल मी पाकिस्तानी चाहत्यांचे आभार मानतो.
दरम्यान 32 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाकिस्तानसाठी 36 कसोटी, 61 वनडे आणि 62 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 119 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत 81 विकेट घेतल्या. तर टी-20 मध्ये त्याने 71 विकेट्स घेतल्या आहेत. 2009 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.