'मॅच फिक्सिंग माफियाच्या तारा भारताशी जोडलेल्या आहेत', माजी पाकिस्तानी गोलंदाज अकीब जावेदचा खळबळजनक आरोप

मॅच फिक्सिंग माफियांच्या तारा भारताशी जोडल्या गेल्या असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अक़ीब जावेद यांनी केला आहे. मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान झालं असल्याची खंत देशाचं अनेक क्रिकेटपटूंनी बोलून दाखवली आहे. पण या दरम्यान, जावेदने फिक्सिंगचे सारं खापर भारतावर फोडलं.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मॅच फिक्सिंग (Match Fixing) माफियांच्या तारा भारताशी (India) जोडल्या गेल्या असल्याचा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अकीब जावेद (Aaqib Javed) यांनी केला आहे. मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानचे (Pakistan) खेळाडू फिक्सिंगचा सापळ्यात अडकलेले आढळून आले आहेत. मॅच फिक्सिंगमुळे पाकिस्तान क्रिकेटचं नुकसान झालं असल्याची खंत देशाचं अनेक क्रिकेटपटूंनी बोलून दाखवली आहे. पण या दरम्यान, जावेदने फिक्सिंगचे सारं खापर भारतावर फोडलं. इंडियन प्रीमियर लीगमधेही (आयपीएल) यापूर्वीही फिक्सिंगबाबत प्रश्न उपस्थित केले होते पण पार्श्वभूमीवर राहून हा व्यवसाय चालवणाऱ्या माफियांच्या विरोधात आवाज उठविण्याची कुणालाही शक्ती नाही असा पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद यांनी असा दावा केला. जावेदने जियो न्यूजला सांगितले की, यापूर्वी आयपीएलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फिक्सिंग माफियांच्या तारा भारताशी जोडल्या गेल्या आहेत. ('मॅच फिक्सिंगमध्ये सामील असलेला मी पहिला किंवा शेवटचा क्रिकेटपटू नाही', पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद असिफ ने PCB वर लगावले गंभीर आरोप)

1990 च्या दशकात फिक्सिंगच्या भ्रष्टाचाराबद्दल जावेदने आवाज उठवला होता. वसीम अकरम, वकार युनिस, सलीम मलिक या खेळाडूंचे मॅच फिक्सिंग संदर्भात नाव घेतल्यानंतर जावेदला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या असं त्याने एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना सांगितल्याचं वृत्त ‘एएफपी’ने दिलं.जावेद म्हणाला, “माझी कारकीर्द अकाली संपली कारण मी फिक्सिंगच्या विरोधात बोललो. मला धमकावले जात होते की मला चिरडून टाकले जाईल. जर आपण फिक्सिंगविरूद्ध बोलका असाल तर आपण आपल्या कारकिर्दीत केवळ काही मर्यादेपर्यंत जाऊ शकता. त्यामुळेच मला पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बनणे शक्य झाले नाही,” असे जावेद यांनी जिओ टीव्हीद्वारे सांगितले.

माजी क्रिकेटपटू पुढे मोहम्मद अमीरच्या क्रिकेटमध्ये परतण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीकेची झोड उठवली. सलमान बट आणि मोहम्मद असिफ यांच्यासह इंग्लंडमध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपावर आमिरवर बंदी घालण्यात आली होती. तो म्हणाला, "या गोष्टी मॅच फिक्सिंगमध्ये गुंतलेल्यांना प्रोत्साहित करतात." “हे माफिया खूप खोलवर काम करतात आणि एकदा आपण त्यात प्रवेश केला तर आपण परत येऊ शकत नाही. बर्‍याच क्रिकेटर्सना शिक्षा झाली पण माफियाची ओळख पटली नाही. या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि हा धोका केवळ कठोर शिक्षा आणि आजीवन बंदीमधून निघून जाईल,” असे ते म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now