MS Dhoni: कॅप्टन कुल एम एस धोनीच्या कुटुंबात न्यू मेंबरची एण्ट्री, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

धोनीच्या या कार्स कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे. धोनीने नुकतीचं कोरियन कंपनीची KIA कार इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.

MS Dhoni: कॅप्टन कुल एम एस धोनीच्या कुटुंबात न्यू मेंबरची एण्ट्री, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Mahendra Singh Dhoni |(Photo Credits: Facebook)

क्रिकेटपटू एम एस धोनी (M S Dhoni) आता टीम इंडियाच्या कुठल्याही मालिकेत खेळत नसला तरी क्रिकेट विश्वात तो रोज चर्चेत असतो. एम एस धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या आयुष्यात काय करतो काय नाही यावर त्याच्या फॅन्सचं (Fans) लक्ष लागलेलं असतं. एम एसची फक्त क्रिकेट लाईफचं नाही तर त्याच्या आवडीनिवडी देखील रंगबिरंगी आहेत. महेद्रसिंह धोनी यावर्षी शेवटचं आयपीएल सिझन (IPL 2023) खेळणार असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अजुनही कुठलाही शिक्कमोर्तब झालेला नाही. तरी एम एस धोनीच्याकडून (M S Dhoni) त्या फॅन्ससाठी एक  मोठी गुडन्यूज (Good News) आहे. याबाबत  धोनीचे फॅन्स (M S Dhoni Fan Club) त्याला सोशल मिडीयावर (Social Media) शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. एम एस धोनीच्या कुटुंबात नव्या मेंबरची एण्ट्री (New Member Entry) झाली आहे.

 

धोनीचं क्रिकेट (Cricket) नंतर कुठल्या गोष्टीवर प्रेम असेल तर ते म्हणजे बाईक्स (Bikes) आणि कार (Car). धोनी कायमंचं त्याच्या आवडीच्या बाईक्स (Bikes) आणि कारच्या कलेक्शन (Car Collection) बद्दल बोलताना दिसतो. तरी धोनीच्या या कार्स कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे. धोनीने नुकतीचं कोरियन कंपनीची KIA कार इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 708 किमी पर्यंत जाऊ शकते. या गाडीची एक्स शोरुम किंमत भारतात जवळपास 60 ते 65 लाख इतकी आहे. (हे ही वाचा:- R Ashwin on Ravi Shastri: अश्विनने घेतला रवी शास्त्रींचा क्लास, व्हीव्हीएस लक्ष्मणला प्रशिक्षक बनवण्याचे सांगितले कारण)

 

सीएसकेकडून खेळलेला क्रिकेटपटू केदार जाधव आणि युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड धोनीच्या रांचीतल्या घरी पोहोचले. तरी कॅप्टन कुल या दोन खेळाडूना घेवून राचींच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसले. एम एस धोनीच्या या नव्या कारचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2022 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).