IND vs NZ 2nd ODI Highlights: रवींद्र जडेजा चे संघर्षपूर्ण अर्धशतक व्यर्थ, दुसर्‍या वनडे सह मालिकेत टीम इंडियाचा पराभव

टीम इंडिया आणि न्यूझीलंड आज ऑकलँडच्या इडन पार्क मैदानावर दुसऱ्या वनडे सामन्यासाठी आमने-सामने येणार आहे. टीम इंडियाऑकलँडमध्ये हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी, टीम इंडियाने किवी दौऱ्या दरम्यान या मैदानावर खेळलले पहिले दोन्ही टी-20 सामने जिंकले आहेत.

08 Feb, 21:04 (IST)

टीम इंडियाविरुद्ध ऑकलँडमधील दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंडने 22 धावांनीं विजय मिळवला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत किवी संघाने दिलेल्या 274 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यासह भारताला तीन वनडे सामन्यांची मालिकासुद्धा गमवावी लागली. टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने आज फलंदाजीने निराश केले. श्रेयस अय्यर आणि जडेजाला वगळता अन्य कोणताही फलंदाजाला धावा करण्यात यश मिळाले नाही. 

08 Feb, 20:54 (IST)

टीम इंडियाला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 28 धावांची गरज आहे. रवींद्र जडेजा आई युजवेंद्र चहल क्रीजवर टिकून आहे. जडेजा 51, चहल 9 धावा करून खेळत आहे. 

08 Feb, 20:41 (IST)

न्यूझीलंडचा नवीन वेगवान गोलंदाज काइल जैमिसन 45 धावांवर नवदीप सैनीला बोल्ड केले. सैनी आणि रवींद्र जडेजाची भागीदारी धोकादायक ठरत असताना जैमिसनने किवी संघाला मोठे यश मिळवून दिले. 44 व्या षटकात सैनीने तीन चौकार ठोकले. शिवाय आऊट होण्यापूर्वी सैनीने एक षटकारदेखील ठोकले होता. 

08 Feb, 19:39 (IST)

भारताने दिलेल्या 274 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमवून 153 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 114 चेंडूत 121 धावांची गरज आहे. रवींद्र जडेजा 31 चेंडूत आणि शार्दूल ठाकूर 14 चेंडूत 18 धावा करून खेळत आहे. 

08 Feb, 19:23 (IST)

हमीश बेनेट ने भारताला सहावा धक्का दिला. 56 चेंडूत न्यूझीलंडविरुद्ध सलग अर्धशतक करणाऱ्या श्रेयस अय्यरला बेनेटने 52 धावांवर पुढील चेंडूवर विकेटकीपर टॉम लाथमकडे कॅच आऊट केले. भारताच्या अडचणी आता वाढल्या आहेत आणि मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

08 Feb, 18:58 (IST)

ऑकलंडच्या ईडन पार्क येथे भारत-न्यूझीलंडमधील दुसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग केला आणि 22 षटकांच्या अखेरीस पाच गडी गमावून 101 धावा केल्या. श्रेयस अय्यर 43 तर रवींद्र जडेजा संघात खेळत आहेत. टीम साऊथीने भारताला पाचवा धक्का दिला त्याने 21 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर केदार जाधवला डी ग्रैंडहोमकडे कॅच आऊट केले. 27 चेंडूत 9 धावा करून तो पॅव्हिलियनमध्ये परतला.

08 Feb, 18:29 (IST)

न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय डावाच्या 15 ओव्हर संपल्यावर भारताने 4 विकेट्स गमावून 75 धावा केल्या. भारतावर आता मालिका पराभवाचे संकट आहे आणि हे टाळण्यासाठी त्यांना एका मोठ्या भागीदारीची गरज आहे. सध्या श्रेयस अय्यर आणि केदार जाधव भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे. 

08 Feb, 18:23 (IST)

विराट कोहलीनंतर केएल राहुलही बोल्ड झाला. कॉलिन डी ग्रैंडहोमने राहुलला 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बोल्ड करत भारताला चौथा धक्का दिला. मागील सामन्यात अर्धशतक करणारा राहुल आज 4 धावाच करू शकला. भारताला इथे मोठ्या भागीदारीची गरज आहे. त्यांनी 71 धावांवर चौथी विकेट गमावली. 

08 Feb, 18:05 (IST)

टीम इंडियाच्या डावाच्या 10 ओव्हर संपुष्टात आल्या आणि भारताच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. पहिल्या पॉवर-प्लेमध्ये भारताने 3 विकेट्स गमावून धावा केल्या आहेत. भारतासाठी केएल राहुल 2 आणि श्रेयस अय्यर 12 धावा करून खेळत आहे. 

08 Feb, 18:03 (IST)

टीम सौदीने 10 व्या षटकात भारताला मोठा धक्का दिला. कर्णधार विराट कोहली बोल्ड झाला. षटकांच्या चौथ्या बॉलवर कोहलीला साऊथीने बोल्ड केले. कोहली 25 चेंडूत 15 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. साऊथीने कोहलीलावनडे सामन्यात सहाव्या वेळी बाद केले. कोहलीला बर्‍याच वेळा बाद करण्याचा तो गोलंदाज ठरला आहे.

08 Feb, 17:41 (IST)

न्यूझीलंडकडून भारतविरुद्ध डेब्यू करणाऱ्या काइल जैमीसनने 5 वी ओव्हर टाकली. जैमीसनने भारताचा दुसरा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ ला 24 धावांवर बोल्ड केले.जैमीसनने आज 19 चेंडूत 6 चौकार मारले. भारताने आता पॉवर-प्लेमध्ये दुसरी विकेट गमावली आहे. 

08 Feb, 17:29 (IST)

न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाला हमीष बेनेटने पहिला धक्का दिला. 21 धावसंख्येवर मयंक अग्रवालला बेनेटने रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. मयंकने आज 5 चेंडूत 3 धावा केल्या. 

08 Feb, 16:45 (IST)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 50 ओव्हरमध्ये न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत 8 विकेट्स गमावून 273 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल याने सर्वाधिक 79 धावा केल्या. हेन्री निकोल्स 41, टॉम ब्लंडेल 22 धावांचे योगदान दिले. मागील सामन्यातील शतकवीर रॉस टेलर 73 धावा करून नाबाद परतला. भारताकडून युजवेंद्र चहल याने सर्वाधिक 3, शार्दूल ठाकूर याने 2 आणि रवींद्र जडेजा याने 1 गडी बाद केला. 

08 Feb, 16:34 (IST)

भारतविरुद्ध डेब्यू करणारा काइल जैमिसन आणि रॉस टेलरमध्ये महत्वाची 38 चेंडूत अर्धशतकी भागीदारी झाली. 48 ओव्हरनंतर टेलर 60 आणि जैमिसन 1 धावा करून खेळत आहे. यासह न्यूझीलंडच्या 250 धावाही पूर्ण झाल्या आहेत. 

08 Feb, 16:28 (IST)

रॉस टेलरने 46 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकल घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. आज जेव्हा मधल्या फळीतील कोणताही फलंदाज धावा करून शकला नाही, तेव्हा टेलरने जबाबदारी स्वीकारली आहे. भारतविरुद्ध वनडे मालिकेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे. 

08 Feb, 15:53 (IST)

रॉस टेलरने आपल्या घरी एकदिवसीय 4000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. त्याने हे स्थान 97 डावांमध्ये मिळवले आहे. यापूर्वी, मार्टिन गप्टिलनेही घरच्या मैदानावर खेळत 4000 वनडे धावा पूर्ण केल्या. 

08 Feb, 15:45 (IST)

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी आज अपेक्षेपेक्षा चांगली प्रदर्शन केले. जिमी निशामनंतर कॉलिन डी ग्रैंडहोम आणि मार्क चैपमैननेही स्वस्तात आपली विकेट गमावली. यजमान किवीजने 187 धावांवर 7 विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडचा पूर्ण संघ 200 धावांच्या आतच ऑलआऊट होईल असे दिसत आहे. शार्दूलने डी ग्रैंडहोमला श्रेयस अय्यरकडे कॅच आऊट केले. आठ चेंडूत पाच धावा केल्यावर तो बाद झाला. तर चैपमैन लॉन्ग ऑनच्या इथून शॉट मारण्याचं प्रयत्नात चहलकडे दोन चेंडूंमध्ये एक धाव करून माघारी परतला.

08 Feb, 15:40 (IST)

जेम्स नीशमच्या भारताला मोठे यश मिळाले आहे. मागील सामन्याचा नायक रॉस टेलरने नवदीप सैनीचा चेंडू खेळला, यावर त्याने एकल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसर्‍या टोकाला तो रवींद्र जडेजाच्या डायरेक्ट हिटपासून वाचू शकला नाही.

08 Feb, 15:30 (IST)

34 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने किवी कर्णधार टॉम लाथमला बाद केले. लाथामने जडेजाच्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, जडेजाच्या जोरदार अपीलवर अंपायरने लाथमला बाद केले. शेवटच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा लाथम 14 चेंडूत केवळ सात धावांवर बाद झाला.

08 Feb, 15:12 (IST)

किवी सलामीवीर मार्टिन गप्टिल शानदार 79 धावांची अर्धशतकी खेळी केल्यावर धावबाद झाला. या खेळीदरम्यान गप्टिलने 79 चेंडूंचा सामना करत आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले.

Read more


टीम इंडिया (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) आज ऑकलँडच्या (Auckland) इडन पार्क मैदानावर दुसऱ्या वनडे सामन्यासाठी आमने-सामने येणार आहे. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 ने पिछाडीवर आहे आणि आजचा सामना जिंकून ते मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असतील. हॅमिल्टनमध्ये झालेल्या तीन सामान्यांचं मालिकेच्या पहिल्या सामान्यासह भारताला किवी दौऱ्यावर पहिल्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या वनडे सामन्यात 347 धावा करूनही भारताला पत्करावा लागला. भारतीय संघावर मालिकेत पुनरागमन करण्याचे दबाव आहे. भारतासाठी मालिकेचा दुसरा सामने आता 'करो-या-मरो'चा सामना बनला आहे. या सामान्य पराभव झाल्यास टीम इंडिया मालिका गमावून बसेल. शिवाय, टी-20 मालिका गमावलेला किवी संघ भारतासमोर मोठे आव्हान देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. दुसरीकडे, या दौऱ्यावर टीम इंडियाऑकलँडमध्ये हॅटट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी, टीम इंडियाने किवी दौऱ्या दरम्यान या मैदानावर खेळलले पहिले दोन्ही टी-20 सामने जिंकले आहेत.

या मैदानावर भारतीय संघ दहावा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. येथे खेळल्या गेलेल्या 9 पैकी चार सामने त्यांनी जिंकले आणि तितक्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशाप्रकारे, या मैदानावर भारताचा रेकॉर्ड फिफ्टी-फिफ्टी आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये इथे अखेरचा वनडे सामना 2014 मध्ये खेळला गेला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ 314 धावा करुन ऑलआऊट झाला होता. प्रत्युत्तरात भारताने नऊ विकेट्स गमावून तितक्याच धावा केल्या.

अशी आहे भारत-न्यूझीलंड वनडे टीम्स

भारत वनडे टीम: केएल राहुल (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर.

न्यूझीलंड वनडे टीम: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम (कॅप्टन/विकेटकीपर), मार्क चैपमैन, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, हामिश बेनेट, ईश सोढी, टॉम ब्लंडेल, काइल जैमिसन, स्कॉट कुग्गेलैन.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now