Lionel Messi in IPL? लिओनेल मेस्सी बार्सिलोना क्लब सोडण्याची चर्चा; आयपीएल फ्रँचायझी KKR ने 'पर्पल व गोल्ड' आर्मीशी जुडण्याची दिली ऑफर
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससारख्या आयपीएल संघांनी सोशल मीडिया पोस्टसह मेस्सीच्या ट्रांसफ़र बॅन्डवॅगनमध्ये उडी घेतली.
जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूंपैकी एक अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) मंगळवारी रात्री उशिरा बार्सिलोना (Barcelona) क्लबला सोडचिट्ठी देण्याचं जाहीर केलं. मेस्सी 2003 पासून बार्सिलोना सोबत खेळत आहे आणि त्याने 444 गोल केले आहेत. मेस्सीचा जून 2021 मध्ये बार्सिलोनासोबत कालबाह्य झाला. बार्सिलोना क्लब (Barcelona Club) सोडण्याच्या मेस्सीच्या निर्णयाने आयपीएल फ्रँचायझीसह (IPL Franchise) जगातील प्रत्येक संघाला उच्च सतर्क केले आहे. ट्रान्स्फर फी सोबत त्याचा पगार, म्हणून अर्जेंटिनाचा सुपर स्टार मेस्सी फार कमी क्लबला परवडणारा आहे. मेस्सीने स्वतःहून क्लब सोडले तर क्लबला त्याच्यासाठी 700 मिलियन यूरो अशी ट्रांसफ़र फी मोजावी लागणार आहे. आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्ससारख्या (Kolkata Knight Riders) आयपीएल संघांनी सोशल मीडिया पोस्टसह मेस्सीच्या ट्रांसफ़र बॅन्डवॅगनमध्ये उडी घेतली. (Lionel Messi's 'Anti-Coronavirus' Mattress: कोविड-19 दूर ठेवण्यासाठी बार्सिलोनाचा सर्वात श्रीमंत फुटबॉलर लिओनेल मेस्सी 88,000 रुपयाच्या 'अँटी-कोरोना' मॅट्रेसवर झोपतो?)
कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) ट्विटरवर मेस्सीसाठी एक खास ऑफर देखील दिली. केकेआरने बार्सिलोनाच्या कर्णधाराचा फोटो कोलकाताच्या आयपीएल शर्टमध्ये पोस्ट केला आणि विचारले, "मिस्टर मेस्सी, जांभळा आणि गोल्ड परिधान करण्याबद्दल काय मत आहे?"
आयपीएलची आणखी एक फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटलसने (डीसी) ट्विटरवर हास्यास्पद घोषणा केली, "अलीकडच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली कॅपिटल्स लिओनेल मेस्सीसाठी बोली लावलेली नाही याची पुष्टी करते."
मेस्सीने आपली संपूर्ण कारकीर्द बार्सिलोनासोबत व्यतीत केली असून त्याने अभूतपूर्व गोष्टीत गाठण्यास मदत केली आणि ला लीगा संघाची जगातील एक एलिट फुटबॉल क्लब म्हणून स्थापना केली. तथापि, आता मेस्सीने बार्सिलोनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याने कॅटालुनियातील अर्जेन्टिना स्टारची वेळ संपुष्टात येत असल्याचं दिसत आहे. मेस्सीच्या नेतृत्वात स्पॅनिश क्लबला चँपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्यूनिखविरुध्द 8-2 अशा लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मेसीच्या बार्सिलोना सोडल्याची चर्चा सुरु झाल्या. गेल्या आठवड्यातच बार्सिलोनाचे नवीन प्रशिक्षक रोनाल्ड कॉमनशी मेस्सीच्या चर्चेनंतर अर्जेंटीनाचा दिग्गज खेळाडू सध्या बार्सिलोनामध्येच राहीलअसे मानले जात होते, परंतु ताज्या बातम्यांनी बार्सिलोना आणि मेस्सी चाहत्यांना निराश केले.