Sexual Harassment प्रकरणी क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल
पत्नी हसीन जहाँ हिने मोहम्मद शमी याच्यावर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, कौटुंबीक छळ आणि मॅच फिक्सिंग यासारखे गंभीर आरोप केले होते. हसीन जहाँ हिने शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले पण, बसीसीआयने शमीला क्लिन चिट दिली होती.
भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांच्याविरोधात हुंड्यासाठी छळ (Dowry Harassment) आणि लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भारतीय दंड संहिता कलम 498 (हुंड्यासाठी छळ) आणि 354-अ (लैंगिक छळ) अन्वये शमीवर पोलिसांनी आरोपत्र गुरुवारी (14 मार्च ) दाखल केले.
मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने पश्चिम बंगाल येथील अलीपोर न्यायालयात गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात शारीरिक आणि मानसिक स्वरुपता छळ केल्याचा आरोप केला होता. तसेच, विवाहीत असतानाही दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचाही हसीन जहाँ हिने आरोप केला होता. या दोन्ही आरोपाबाबत जहाँ हिने पोलिसांकडे तक्रार केली होती. (हेही वाचा, IPL 2019 मध्ये किती सामने खेळायचे याचा निर्णय पूर्णपणे खेळाडू घेतील- विराट कोहली)
गेल्या वर्षीच्या (2018) मार्च महिन्यात मोहम्मद शमी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याचा कौटुंबीक वाद सार्वजनिक रुपात बाहेर आला होता. पत्नी हसीन जहाँ हिने मोहम्मद शमी याच्यावर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, कौटुंबीक छळ आणि मॅच फिक्सिंग यासारखे गंभीर आरोप केले होते. हसीन जहाँ हिने शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले पण, बसीसीआयने शमीला क्लिन चिट दिली होती.