क्रिकेट खेळताना क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू, बॅटींग करताना घडली घटना

मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. रुग्णालयाने सोनूच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा.

cricket | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

क्रिकेट (Cricket) खेळताना एका खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाला. ही घटना कोलकाता (Kolkata) येथे घडली. सोनू यादव असे या खेळाडूचे नाव आहे. तो बालीगंज स्पोर्ट क्लब ( Ballygunge Sporting Club) संघाकडून खेळत होता. मैदानावर फलंदाजी करत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मैदानावर खेळत असताना सोनू यादव (Sonu Yadav) (वय 22 वर्षे) याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी 11 च्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, सोनू यादव हा बालीगंज स्पोर्ट क्लब संघाच्या खेळाडूंसोबत दैनंदिन सराव करत होता. सहकाऱ्यांसोबत सराव सामना खेळत असताना तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दरम्यान, त्याची प्रकृती अचानक बिघडली. मैदानावरील त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडली. त्याची प्रकृती पाहून सहकाऱ्यांनी आणि उपस्थित क्रिडा अधिकाऱ्यांनी त्याला क्लबच्या आरोग्य विभागात दाखल केले. मात्र, तेथे त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले.

सोनू याला एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. रुग्णालयाने सोनूच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा. सोनूच्या सहकारी खेळाडूंनी सांगितले की, सोनू मैदानावर नेहमीप्रमाणे सराव करत होता. मात्र, सोनूच्या सहकाऱ्यांनी क्बल दोषी धरले आहे. स्पोर्ट क्लबने आवश्यक सोयी सुविधा न दिल्यानेत सोनूचा मृत्यू झाल्याचा आरोप या खेळाडूंनी केला आहे.

आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा क्लबने कोणत्याही प्रकारे मैदानावर पुरवल्या नाहीत. त्यामुळेच सोनूचा मृत्यू झाला. आवश्यक सुविधा जर वेळेत मिळाल्या असत्या तर कदाचित सोनूचे प्राण वाचले असते, असेही या खेळाडूंनी म्हटले आहे. दरम्यान, सोनूचा मृत्यू आणि खेळाडूंनी केलेला आरोप याबातब क्लबन प्रशासनाने मात्र अद्यापक कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (हेही वाचा, मुंबई: क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका; क्रिकेटपटूचा मृत्यू)

सोनू यादव यांच्या मृत्यूनंतर कारवाई करण्यासाठी पोलीस मैदानावर पोहोचले. त्यांनी घटनेची नोंद घेऊन चौकशी सुरु केली आहे. सोनूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूबाबत खुलासा होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.