Ireland vs South Africa ODI Head To Head Record: दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात कोण ठरेल वरचढ? येथे हेड टू हेड आकडेवारी पहा
उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे.
Ireland National Cricket Team vs South Africa National Cricket Team ODI Head To Head: आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर होणार आहे. टी 20 मध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळेल. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने दमदार पुनरागमन करत आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव केला. यादरम्यान दोन सामन्यांची टी 20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. अशा स्थितीत वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते. आयर्लंडकडून कर्णधारपदाची धूरा पॉल स्टर्लिंग याच्या खांद्यावर असेल. याशिवाय संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची कमान टेंबा बावुमा सांभाळेल. (हेही वाचा:SA vs IRE 1st ODI 2024 Preview: दक्षिण आफ्रिकेला आणि आयर्लंड यांच्यात 'चुरशीची लढत'; हेड टू हेड, मिनी बैटल आणि स्ट्रीमिंगसह येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील )
दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड
आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आतापर्यंत एकूण 8 वेळा एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 6 सामने जिंकले आहेत. तर आयर्लंडने 1 सामना जिंकला आहे. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला आहे. दोन्ही संघांमधील मागील तीन सामन्यांवर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेने 1 सामना जिंकला आहे. तर आयर्लंडने एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, फिओन हँड, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रेस, गेविन होई, नील रॉक, स्टीफन डोहेनी
दक्षिण आफ्रिकेचा संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर डुसेन, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेने (विकेटकीपर), वियान मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, ब्योर्न फोर्टुइन, न्काबा पीटर, लुंगी एनगिडी, ओटनी, ओटनी बर्जर, जेसन स्मिथ, लिझाद विल्यम्स