IPL Auction 2025 Live

IPL: लिलावात हिरो पण कामगिरी 'झिरो, संघ मालकांनी या खेळाडूंसाठी दुपटीने मोजले पैसे मात्र मैदनात ठरले फ्लॉप

खेळाडू प्रभावी कामगिरी करत असल्यास फ्रँचायझी त्यांना मोठी रक्कम देण्यात मागेपुढे पाहत नाही, पण दुर्दैवाने, असे अनेक खेळाडू आहे ज्यांनी मात्र अपेक्षा भंग केले. आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना कोटी रुपये देऊनही प्रभावी कामगिरी करता आली नाही.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

Expensive Players Who Failed In IPL: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांऐवजी, फायदेशीर घरगुती टी-20 लीगमधील खेळाडू, फ्रँचायझी आणि लीगद्वारे मिळणार्‍या उत्पन्नातून पैसे गुंतवणूकीसाठी चर्चेचा विषय ठरतात. खेळाडूंच्या लिलावादरम्यान मिळणार भरामसार पैसा हा चर्चेचा एक मोठा पैलू आहे. मागील 13 हंगामात अनेक खेळाडू या प्रसिद्ध लीगमधून कमाई करत करोडपती झाले आहेत. काही क्रिकेटपटूंसह फ्रँचायझीने कोटी रुपयात करार केला, तर काही प्रसंगी फ्रँचायझी मोठ्या खेळाडूंना कमी किंमतीत विकत घेतले आहे. खेळाडू प्रभावी कामगिरी करत असल्यास फ्रँचायझी त्यांना मोठी रक्कम देण्यात मागेपुढे पाहत नाही, पण दुर्दैवाने, असे अनेक खेळाडू आहे ज्यांनी मात्र अपेक्षा भंग केले. (IPL 2021 Auction Date: आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी या दिवशी चेन्नई येथे होणार खेळाडूंचा लिलाव)

आज आपण अशाच खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना कोटी रुपये देऊनही प्रभावी कामगिरी करता आली नाही.

1. ग्लेन मॅक्सवेल

2013 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या त्याच्या अविश्वसनीय खेळीनंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलूचा आयपीएल ग्राफ खालच्या दिशेने फिरला. आयपीएल लिलावात त्याला नेहमीच मोठी रक्कम मिळवून दिली, पण दुर्दैवाने तो मैदानावरील कामगिरीमुळे मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला आहे. 2018 मध्ये त्याचा दिल्ली फ्रँचायझीसाठी निराशाजनक हंगाम ठरला. तो मैदानावर अगदी कमजोर दिसला आणि मधल्या ओव्हरमध्ये महत्त्वपूर्ण षटकांत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरला. त्याने 12 सामन्यांत 140 च्या स्ट्राईक रेटने केवळ 169 धावा केल्या आणि आयपीएलच्या पुढच्या सत्रात त्याने माघार घेतली.

2. जयदेव उनाडकट

आयपीएल 2017 मध्ये राइजिंग पुणे सुपरजायंटच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यामागे उनाडकट मुख्य कारण होता. पण, त्याची सर्वोत्तम कामगिरी एकाच हंगामापर्यंत सीमित राहिली आणि पुढच्या दोन हंगामात तो खूपच खराब कामगिरी करत राहिला. 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये चढाओढ झाली. राजस्थानने लिलावात त्याला खरेदी केले पण वेगवान गोलंदाजाने मैदानावर केलेल्या कामगिरीने निराश केले. 2018 मध्ये, राजस्थान रॉयल्सने त्याला सर्वाधिक 11.5 कोटी रूपयात खरेदी केले पण 9.47 च्या इकॉनॉमीने 11 विकेट घेतल्या.

3. युवराज सिंह

युवराज सिंह आयपीएलमध्ये मोठी निराशा ठरला. युवीला 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने तब्बल 16 कोटी रुपयात खरेदी केले आणि हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. 2015 आवृत्तीत दिल्लीकडून खेळताना युवराज 14 डावांमध्ये 19.7 च्या सरासरीने आणि 118.9च्या स्ट्राईक रेटने केवळ 248 धावाच करू शकला. पुढील सत्रात दिल्लीने रिलीज करण्यापूर्वी युवी बॅटने अपयशी ठरला.

4. बेन स्टोक्स

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आयपीएल 2018 चा सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सला 12.5 कोटी रुपयांत इंग्लंड अष्टपैलूला खरेदी केले. दुर्दैवाने, स्टोक्स आपली किंमत सार्थ ठरवण्यात अपयशी ठरला. त्याने एकूण 148 धावा केल्या आणि 8 सामन्यांत फक्त एक विकेट घेतली. स्टोक्स आपला फॉर्म परत मिळवत असताना इंग्लंड बोर्डाने त्याला राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी परत बोलावले.

5. दिनेश कार्तिक

नियमित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात अपयशी ठरलेल्या दिनेश कार्तिकने घरगुती क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. 2014 मध्ये दिल्लीकडून खेळलेल्या कार्तिकचा सरासरी हंगाम ठरला आणि आयपीएलच्या 2015 लिलावापूर्वी फ्रँचायझीने त्याला रिलीज केले. लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला 10.5 कोटी रुपयात खरेदी करत सर्वांना चकित केले. विकेटकीपर म्हणून त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली, परंतु त्याने मोसमात बॅटने 16 सामन्यांत 12.81 च्या सरासरीने केवळ 141 धावा केल्या.