IPL 2022: अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज Jason Roy याच्या जागी गुजरात टायटन्स संघात एन्ट्री घेण्यासाठी सज्ज, वाचा सविस्तर

IPL 2022: आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी गुजरात टायटन्स जेसन रॉयच्या जागी अफगाणिस्तानचा हार्ड हिटिंग सलामीवीर रहमामुल्ला गुरबाज याला संधी देण्यासाठी सज्ज आहे. रॉयने जास्त काळ बबलमध्ये राहावयाचे नसल्याचे कारण देत लिलावानंतर आयपीएलमधून माघार घेतली. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान खेळाडू आयपीएल लिलावात 50 लाखाच्या मूळ किमतीत उतरला होता, परंतु त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही.

रहमानउल्ला गुरबाज (Photo Credit: Twitter)

Jason Roy IPL 2022 Replacement: इंग्लंडचा तडाखेबाज सलामी फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) याने आयपीएलच्या (IPL) सुरुवातीपूर्वीच बायो-बबलच्या थकव्याचा हवाला देत माघार घेऊन नवोदित गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या अडचणीत वाढ केली आहे. बायो बबल आणि वैयक्तिक कारणे सांगून रॉयने लिलावानंतर लीगमधून माघार घेतली. अशा परिस्थितीत आता गुजरात फ्रँचायझीपुढे योग्य बदली खेळाडू शोधण्याचा मोठा पेच उभा राहिला आहे. तथापि गुजरातने रॉयच्या बदली खेळाडूची निवड केली असल्याचे समोर आले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या आधी गुजरात टायटन्स रॉयच्या जागी अफगाणिस्तानचा हार्ड हीटिंग सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याचा संघात समावेश करण्यात सज्ज आहे. (IPL 2022: गुजरात टायटन्सचा Jason Roy याचा भावनिक संदेश, आयपीएलमध्ये का सहभागी होणार नसल्याचे कारण केले स्पष्ट)

गुरबाजबाबत फ्रँचायझीकडून कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नसली तरी वृत्तानुसार, फ्रँचायझीने अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर आणि गुरबाजचा वरिष्ठ राशिद खान यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. गुरबाजबाबत बोलायचे तर एक सलामीवीर म्हणून 150 पेक्षा जास्त टी-20 स्ट्राइक रेट असण्याव्यतिरिक्त तो हा एक सुलभ विकेटकीपर देखील आहे. यामुळे तो एक बहु-उपयोगी खेळाडू बनतो. सर्वात रोमांचक पैलू म्हणजे 20 वर्षीय खेळाडू मोठे फटके खेळण्यास देखील माहीर आहे. त्याने आतापर्यंत कारकीर्दीत 69 टी-20 सामन्यांमध्ये 113 षटकार खेचले आहेत. त्याने आपल्या छोट्या पण रोमांचक कारकिर्दीत आतापर्यंत 9 वनडे आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत. गुजरात टायटन्सने अद्याप अधिकृतपणे गुरबाजला बदली म्हणून घोषित केलेले नसून ते बीसीसीआयच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहत आहेत. दरम्यान, गुरबाजच्या एन्ट्रीमुळे टायटन्ससाठी आणखी एक समस्या सुटू शकते आणि ती म्हणजे विकेटकिपिंगची डोकेदुखी. मॅथ्यू वेड आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उपलब्ध होणार असेल आणि संघातील दुसरा कीपर म्हणजे ऋद्धिमान साहा, ज्याला अलीकडच्या काळात फारसा टी-20 रेकॉर्ड नसतानाही खेळण्यास भाग पाडले जाऊ शकते.

याशिवाय पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान आणि इस्लामाबाद युनायटेड, लंका प्रीमियर लीगमध्ये कॅंडी टस्कर्स आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायगर्स यांच्याकडून खेळलेला गुरबाज फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नावाजलेला आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानचा खेळाडू आयपीएल लिलावात 50 लाखाच्या मूळ किमतीत उतरला होता, पण त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now