IPL 2022 Closing Ceremony: समारोपाच्या समारंभात बॉलीवूड ताऱ्यांची उपस्थिती; कार्यक्रमाची वेळ, Guest लिस्ट आणि सर्वकाही जाणून घ्या
2018 नंतर प्रथमच आयपीएलचा समारोप सोहळा होणार आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून समारोप किंवा उद्घाटन समारंभ आयोजित केला नव्हता.
IPL 2022 Closing Ceremony: आयपीएल (IPL) 2022 च्या जेतेपदाची सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना रविवारी, 29 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1,30,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांसमोर हा सामना खेळला जाईल. दरम्यान, तीन वर्षांत प्रथमच सर्वात मोठ्या टी-20 लीगचा दणक्यात समारोप होईल. समारोप समारंभ 29 मे, रविवार रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2022 चा समारोप समारंभ (IPL Closing Ceremony) सुमारे 45 मिनिटांचा असेल. 2018 नंतर प्रथमच आयपीएलचा (IPL) समारोप सोहळा होणार आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून समारोप किंवा उद्घाटन समारंभ आयोजित केला नव्हता. त्याच वेळी, 2020 आणि 2021 हंगामातील कोरोना महामारीमुळे समारोप समारंभ पुढे ढकलावा लागला. (IPL 2022 Closing Ceremony: आयपीएल समारोप समारंभात BCCI साजरी करणार स्वातंत्र्याची 75 वर्षे; रणवीर सिंह, AR रहमान लावणार बॉलीवूडचा तडका)
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान 29 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजारो लोकांसमोर सादरीकरण करणार आहेत. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील आयपील 2022 च्या समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे. अहवालानुसार आमिर खान देखील त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलर लाँच करणार आहे. याशिवाय सोहळा झारखंडच्या छाऊ नृत्याचे कलाकारही सादर करणार आहेत. प्रभात कुमार महतो यांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय छाऊ नृत्य पथक 24 मे रोजीच गुजरातला रवाना झाले होते. या संघाने भूतान, संयुक्त अरब अमिराती, चीन अशा अनेक देशांमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. या दौऱ्याचा सर्व खर्च बीसीसीआय करणार आहे. प्रभात महतो यांचा समूह मानभूम छाऊ सादर करणार आहे, जो छाऊ नृत्याच्या सर्वात प्रसिद्ध प्रकारांपैकी एक आहे. तसेच समारंभात भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ टीम इंडियाचा गेल्या 75 वर्षांचा प्रवासही प्रदर्शित केला जाणार आहे.
आयपीएल 2022 समारोप समारंभ : पाहुण्यांची यादी
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2022 च्या फायनलला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सचिव जय शाह, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सामन्याला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि राज्यातील काही राजकीय व्यक्ती देखील उपस्थित राहणार आहेत.