IPL 2021 Suspended: COVID 19 च्या वाढत्या संकटामुळे IPL 2021 चा यंदाचा संपूर्ण सीझन रद्द
चार विविध टीम्स मध्ये खेळाडू आणि सदस्य कोविड पॉझिटीव्ह असल्याचं समजल्यानंतर आता आयपीएल 2021 रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.
भारतामध्ये वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे आता आयपीएल 2021 चा संपूर्ण सीझन रद्द करण्यात आला आहे. चार विविध आयपीएल टीम्स (IPL) मधील खेळाडू हे कोरोनाबाधित असल्याचं आढळले आहेत. काही सामने लांबणीवर टाकण्याची चर्चा सुरू असतानाच आता IPL 2021 संपूर्ण सीझन गुंडाळल्याची माहिती BCCI चे Vice-President Rajeev Shukla यांनी दिली आहे.
CSK चा बॉलिंग कोच एल बालाजी, वरूण चक्रवर्ती आणि संदीप वारियर हे खेळाडू काल तर सनराइजर्स हैदराबाद मधील खेळाडू Wriddhiman Saha याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही संसर्गाची साखळी पुढे वाढू नये म्हणून आता खबरदारीच्या दृष्टीने तात्काळ यंदाचा सीझन तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. IPL 2021: भारतातील कोरोना परिस्थितीवर खेळाडू सतत चर्चा करत असतात- रिकी पॉन्टिंग.
IPL Tweet
दरम्यान भारतात कोविड 19 च्या गंभीर आरोग्य संकटामध्येही आयपीएल सामने खेळवले जात असल्याने अनेक क्रिकेट जगतातून टीका होत होती. तर काही परदेशी खेळडूंनी आयपीएल मधून वॉकआऊट करत पुन्हा मायदेशी परतण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे आता अखेरीस हा सीझन रद्द झाला आहे.
दरवर्षी आयपीएल चे सामने महिनाभर खेळवले जातात यामध्ये भारतासह परदेशी खेळाडू देखील सहभागी होत खेळतात. आतापर्यंत सर्वाधिक वेळा मुंबई इंडियन्सने या मानाच्या आणि लोकप्रिय क्रिकेट लीग मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियंस 5 वेळा तर सीएसके सर्वाधिक 3 वेळा विजयी झाली आहे