IPL 2021: Shreyas Iyer आता बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 12वा खेळाडू? कोच Ricky Ponting यांच्या आमंत्रणावर DC कॅप्टनची मजेदार रिअक्शन (Watch Video)
आयपीएल 14 मधील दिल्लीच्या पहिल्या सामन्यानंतर दिल्लीचे कोच आणि फलंदाजी दिग्गज पोंटिंग यांनी प्रीमियर फलंदाज श्रेयस अय्यरसाठी खास संदेश दिला. अय्यरशी बोलताना डीसी कोचने जखमी फलंदाजास पंतच्या नेतृत्वातील संघाचा 12वा खेळाडू बनण्यासाठी देखील आमंत्रित केले ज्यावर मुंबईकर फलंदाजाला हसू अनावर झाले.
IPL 2021: दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) यंदाच्या आयपीएल हंगामात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अनुपस्थित असला तरी रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वात संघाने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवत इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. आयपीएल (IPL) 14 मधील दिल्लीच्या पहिल्या सामन्यानंतर दिल्लीचे कोच आणि फलंदाजी दिग्गज रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांनी प्रीमियर फलंदाज श्रेयस अय्यरसाठी खास संदेश दिला. दिल्ली कॅपिटल्स खेळाडूंशी पॉन्टिंगचे चांगले संबंध आहे आणि मुख्य प्रशिक्षकांनी माजी कर्णधार श्रेयस अय्यरशी संवाद साधला त्यावरून हे स्पष्ट झाले. व्हर्च्युअल कॉलमध्ये श्रेयस अय्यरशी बोलताना पॉन्टिंग म्हणाले की टीमने त्याला कमतरता जाणवली आणि त्याच्या नव्या हेअर स्टाईलची देखील प्रशंसा केली. इतकंच नाही तर अय्यरशी बोलताना डीसी (DC) कोचने जखमी फलंदाजास पंतच्या नेतृत्वातील संघाचा 12वा खेळाडू बनण्यासाठी देखील आमंत्रित केले ज्यावर मुंबईकर फलंदाजाला हसू अनावर झाले. (CSK vs DC IPL 2021 Match 2: शिखर धवनचे धमाकेदार अर्धशतकाने दिल्लीची झोक्यात सुरुवात, चेन्नईवर 7 विकेट्सने केली मात)
“तुझी आठवण येतेय, पहिल्या सारखं वाटत नाही. ये आमच्यात सामील हो, फक्त 7 दिवस (क्वारंटाईन) आहे. तो फटाफट निघून जाईल, माझ्यावर विश्वास ठेवा. आम्हाला 12व्या खेळाडूची गरज आहे. आमच्यासाठी ड्रिंक्स घेऊन जाणाऱ्यासाठी एखाद्याची गरज आहे,” दिल्ली कॅपिटलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पॉन्टिंगने म्हणाले. दरम्यान, श्रेयस अय्यरने खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर शनिवारी रुग्णालयातून घरी आल्याचे सांगितले आणि आपल्या खांद्यांची एक झलक आपल्या मुख्य प्रशिक्षकाला दाखवली. उल्लेखनीय म्हणजे शनिवारी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत पंतने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आणि आयपीएलमध्ये कर्णधारपदाची विजयी सुरुवात केली. आयपीएलमधील आपल्या सलामीच्या सामन्यात दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जला 7 विकेटने पराभूत केले.
शिवाय, पॉन्टिंगसह बोलताना आपण दिल्ली संघाला चीअर करण्यासाठी आगामी सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित असण्याचं देखील श्रेयसने म्हटलं. अय्यर म्हणाला, “मी तुम्हाला चीअर करण्यासाठी तिसऱ्या सामन्यात उपस्थित राहू इच्छितो. उद्या मी येऊ शकत नाही कारण वेदना खूपच खराब आहे परंतु कदाचित मी तिसर्या सामन्यासाठी तिथे असेन,” अय्यर म्हणाला. अय्यरच्या नेतृत्वात डीसीने 2020 च्या हंगामात पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला होता. आयपीएल 2021 मधील दुसर्या सामन्यात कॅपिटल्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी गुरुवारी होईल. हा सामना देखील मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2021 10:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

