IPL 2021: काय सांगता! Chris Morris नव्हे, ‘हा’ भारतीय आहे आयपीएल इतिहासातील 'Most Expensive Player', मिळते इतकी रक्कम
दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूने आयपीएल लिलावाच्या इतिहासातील राजस्थान रॉयल्सकडून 16.25 कोटींची बोली आकर्षित केली. मॉरिसने युवराज आणि कमिन्स या दोघांना मागे टाकले असले तरी तो सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू नाही.
IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) रिलीज केल्याचा दक्षिण आफ्रिकी वेगवान गोलंदाज क्रिस मॉरिसला (Chris Morris) मोठा फायदा झाला. दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूने आयपीएल लिलावाच्या इतिहासातील राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) 16.25 कोटींची बोली आकर्षित केली. रॉयल्सने मोजलेली रक्कम त्याला स्पर्धेच्या इतिहासातील 'सर्वात मोठी खरेदी' बनविते, तरीही तो अजूनही एकूणच महागडा खेळाडू नाही. आयपीएलच्या लिलावात मॉरिसपूर्वी युवराज सिंहसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने (कॅपिटल्स) 2015 लिलावात 16 कोटी रुपये खर्च केले होते. गेल्या हंगामातील लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला सर्वाधिक किंमत देत संघात सामील केले होते. आयपीएलच्या लिलावात विकला गेलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून मॉरिसने युवराज आणि कमिन्स या दोघांना मागे टाकले असले तरी तो सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू नाही. (IPL 2021 Auction: ‘या’ रिलीज केलेल्या खेळाडूंना आयपीएल 14 लिलावात मिळाला चांगला भाव, केली बंपर कमाई)
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक मानधन घेण्याचा रेकॉर्ड रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. कोहली फ्रँचायझीकडून प्रत्येक हंगामात 17 कोटी रुपयांची कमाई करतो. आयपीएल 2018 लिलाव हा 'मेगा लिलाव' होता आणि फ्रँचायझींना केवळ जास्तीत जास्त तीन खेळाडूंना रिटेन परवानगी मिळाली होती. रिटेन्शनची रचना अशी होती की पहिल्या रिटेन केलेल्या खेळाडूला 15 कोटी, दुसऱ्याला 11 कोटी आणि 7 कोटींचा पॅकेज मिळाला. आरसीबीने मात्र, रिटेन्शनमध्ये थोडा बदल केला जेणेकरून विराटला 17 कोटींचा पॅकेज मिळाला. आरसीबीची दुसरे पसंती एबी डिव्हिलियर्स होता ज्याला 11 कोटी आणि सरफराज खान तिसरी निवड होता ज्याने 1.75 कोटी मिळवले. यासह, 2018 हंगामापासून कोहली वर्षाला 17 कोटी रुपये कमवत आहे. दरम्यान, मॉरिसचा आपल्या संघात समावेश करण्यासाठी आरसीबी, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांत चुरशीची लढत पाहायला मिळाली मात्र, अखेरीस रॉयल्सने बाजी मारली.
दुसरीकडे, पुढील हंगामात जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये आणखी एक मोठा लिलाव होईल तेव्हा त्याची रिटेन्शनची रचना बदलू शकते. पुढच्या हंगामात आर्थिक मॉडेलही बदलण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे काही अव्वल खेळाडूंना अधिक पैसे कमविण्याचा मार्ग सुलभ होईल.