IPL 2021: आयपीएल 2021 ची ऑक्शन डेट रिलीज; 'या' खेळाडूवर लागू शकते सर्वाधिक बोली
ज्या खेळाडूंना पुढील सीजनसाठी खेळवायचे नाही आहे. अशा खेळाडूंना टीम मॅनेजमेंटने 21 जानेवारी पर्यंत रिलीज करण्याचे आदेश बीसीसीआयने दिले आहेत.
IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा 14 व्या सीजनची तयारी सुरु झाली आहे. ज्या खेळाडूंना पुढील सीजनसाठी खेळवायचे नाही आहे. अशा खेळाडूंना टीम मॅनेजमेंटने 21 जानेवारी पर्यंत रिलीज करण्याचे आदेश बीसीसीआयने (BCCI) दिले आहेत. तसंच 2021 च्या आयपीएलसाठी 11 फेब्रुवारी रोजी देशात मीनी ऑक्शनचे (Auction) आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व टीम मॅनेजमेंट सहभागी होतील आणि रिलीज केलेले खेळाडू तसंच देशातील युवा खेळाडूंना आपल्या संघात सहभागी करण्याचा प्रयत्न करतील.
आयपीएल 2021 मध्ये भारतीय टीमचे माजी खेळाडू आणि चैन्नई टीममधून वैयक्तिक कारणासाठी बाहेर झालेला स्टार क्रिकेटर सुरेश रैना ला आपल्या टीममध्ये सहभागी करुन घेण्यासाठी टीम मॅनेजमेंटमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. रैनाचे आयपीएल करीअर उत्तम राहीले आहे. आपीएल मध्ये आतापर्यंत 193 सामने खेळत 189 इनिंग्स मध्ये 33.3 अॅव्हरेजसह 5368 धावा केल्या आहेत. (Suresh Raina ने शेअर केला मुलगा Rio सोबतचा Cute Video; सलमान खान च्या गाण्यावर पाहायला मिळाले बापलेकांचे बॉन्डींग)
याशिवाय सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात देशासाठी 18 कसोटी सामन्यात 31 इनिंग्समध्ये 26.5 च्या कव्हरेजसह 768 धावा केल्या आहेत. याशिवाय त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये देशासाठी 226 सामन्यात 194 इनिंग्समध्ये 5615 धावा केल्या आहेत. तसंच 78 T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 66 इंनिंग्समध्ये 1605 धावा केल्या आहेत. याशिवाय डोमॅस्टीक टूर्नामेंटमध्ये 193 सामन्यांमध्ये 69 इंनिंग्समध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, आयपीएलचा 13 वा सीजन कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये पार पडला. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने विजयाची परंपरा कायम राखत ट्राफी आपल्या नावे केली. यापूर्वी झालेल्या आयपीएल सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने 5 वेळा, चैन्नई सुपरकिंग्स ने 3 वेळा आणि कोलकत्ता नाईट रायटर्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाने 2 वेळा तर राजस्थान रॉयल्सने एकदा आयपीएलचे विजतेपद पटकावले आहे.