IPL 2021: युएई येथे आयपीएल 14 च्या दुसर्या लेगमधून हे 10 मोठे खेळाडू होतील टूर्नामेंट मधून गायब
बीसीसीआयने आयपीएल 2021 चे उर्वरित सामने आयोजित करण्याची योजना आखली आहे.काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सदस्यांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर 2 मे रोजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. तथापि, प्रत्येक देशातील खेळाडूंचा सक्रिय सहभाग कदाचित दुसर्या टप्प्यात अनुपस्थित असेल. भारतीय खेळाडू दुसर्या टप्प्यात भाग घेतील, तर काही आंतरराष्ट्रीय खेळाडू उपलब्ध नसतील.
IPL 2021: बीसीसीआयने (BCCI) आयपीएल (IPL) 2021 चे उर्वरित सामने आयोजित करण्याची योजना आखली आहे.काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सदस्यांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर 2 मे रोजी स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. टूर्नामेंट निलंबित होण्यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये 29 थरारक सामने पाहायला मिळाले. तथापि, बीसीसीआयने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा आयोजित करण्याची योजना आखली आहे. 29 मे रोजी होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय (BCCI) अंतिम निर्णय घेईल. पण सर्वकाही सुरळीत झाल्यास आयपीएलचा दुसरा टप्पा युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येऊ शकतो. तथापि, प्रत्येक देशातील खेळाडूंचा सक्रिय सहभाग कदाचित दुसर्या टप्प्यात अनुपस्थित असेल. भारतीय खेळाडू आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात भाग घेतील, तर काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आंतरराष्ट्रीय वेळापत्रकांमुळे उपलब्ध नसतील. (IPL 2021: UAE मध्ये आयपीएल खेळवण्यासाठी BCCI पुढे कठीण आव्हाने, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झाल्यास परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर सस्पेंस)
जोस बटलर (Jos Buttler)
बटलर कदाचित स्पर्धेच्या दुसर्या टप्प्यात उपलब्ध नसेल. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा बटलर हा इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या स्वरूपाचा महत्त्वपूर्ण सदस्य आहे त्यामुळे तो पाकिस्तान दौर्यावर संघासोबत असेल. मर्यादित षटकांच्या स्वरूपात तो इंग्लंडचा उप-कर्णधार देखील आहे.
बेन स्टोक्स (Ben Stokes)
राजस्थान रॉयल्सचा स्टोक्स हा आणखी एक इंग्लिश खेळाडू आहे जो कदाचित आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात उपलब्ध नसेल. ऑक्टोबरमध्ये तो पाकिस्तान दौर्याचा भाग असेल ज्यामुळे तो कदाचित दुसर्या टप्प्यात खेळू शकणार नाही.
इयन मॉर्गन (Eoin Morgan)
मॉर्गन इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार आहे. ऑक्टोबरमध्ये इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध दोन टी-20 सामने खेळणार असल्याने या दौर्यादरम्यान इयोन मॉर्गन संघाचे नेतृत्व करणार आहे. परिणामी, तो आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात खेळी शकणार नाही जे कोलकाता नाईट रायडर्ससाठी धक्कादायक असेल कारण मॉर्गन संघाचा कर्णधार आहे.
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow)
बेअरस्टो हा आणखी एक इंग्लिश खेळाडू आहे जो कदाचित आयपीएल 2021 च्या दुसर्या लेगसाठी उपलब्ध नसेल. तो टी -20 आय मालिकेसाठी पाकिस्तान दौर्यावर जाणार्या इंग्लंड संघातही सहभागी होणे अपेक्षित आहे.
डेविड मलान (Dawid Malan)
मालनने आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना पदार्पण केले. मालन नंबर एक टी-20 फलंदाज आहे, म्हणूनच इंग्लंडच्या टी-20 संघात समावेश होणे अपेक्षित आहे.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
मॅक्सवेल एक ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे जो कदाचित आयपीएल 2021 च्या दुसर्या लेगसाठी उपलब्ध नसेल. मॅक्सवेल आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये दाखल झाला. मॅक्सवेल उपखंडातील उत्कृष्टतेसाठी ओळखला जातो त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ त्याला बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी निश्चितच संघात स्थान देईल. परिणामी, कदाचित तो आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात भाग घेऊ शकणार नाही.
मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis)
दिल्ली कॅपिटल्ससाठी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळलेला स्टोइनिसचा कांगारू संघाच्या बांग्लादेश दौऱ्यावर टी-20 संघात समावेश केला जाऊ शकतो ज्यामुळे त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावर सस्पेंस बनून आहे.
झे रिचर्डसन (Jhye Richardson)
रिचर्डसनला आयपीएल 2021 च्या लिलावात पंजाब किंग्ज फ्रँचायझीने 14 कोटी खरेदी केले होते. बिग बॅश लीग 2020-21 मधील त्याच्या शानदार कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाने यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवड केली. त्याने 5 सामन्यांत 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी रिचर्डसन देखील ऑस्ट्रेलियाच्या संघात सामील होण्याची अपेक्षा आहे.
स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)
तिन्ही फॉर्मेटमध्ये स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित भाग आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्मिथ आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या वर्षाच्या अखेरीस ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तो बांग्लादेश दौर्याचादेखील भाग असेल, त्यामुळे आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला मुकण्याची शक्यता आहे.
डेविड वॉर्नर (David Warner)
वॉर्नर आयपीएलमधील सर्वात महत्वाचा फलंदाज आहे. आयपीएल 2021 मध्ये वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले पण आयपीएल 2021 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर माढ्यातच कर्णधार म्हणून काढून टाकण्यात आले. वॉर्नर हा तिन्ही फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाचा नियमित भाग आहे आणि बांग्लादेश दौर्यामुळे कदाचित तो आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात भाग घेऊ शंभर नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)