IPL 2021 Auction: आयपीएल 14 साठी ‘या’ 5 खेळाडूंना Retain करणं फ्रँचायझींना पडू शकते महागात

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 2021 हंगामासाठी आठही फ्रँचायझींनी बुधवारी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आणि जाहीर केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं आश्चर्यकारक किंवा धक्कादायक ठरले. आज आपण अशाच पाच खेळाडूंबद्द्दल जाणून घेणार आहोत ज्यांना संघात कायम ठेवण्याच्या फ्रँचायझीच्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले.

शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक (Photo Credit: Twitter/PTI)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 2021 हंगामासाठी आठही फ्रँचायझींनी बुधवारी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आणि जाहीर केलेल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं आश्चर्यकारक किंवा धक्कादायक ठरले. फ्रँचायझींनी काही मोठ्या नावांना बाहेरचा रस्ता दाखवला तर कामगिरीने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंना कायम ठेवले आहे जे आगामी हंगामात संघाला महागात पडू शकते. आयपीएलच्या (IPL) 14व्या हंगामासाठी लिलाव यंदा फेब्रुवारी महिन्यात आयोजित होणार आहे, आणि फेल ठरलेल्या खेळाडूंशी साथ कायम ठेवण्याचा निर्णय फ्रँचायझीला महागात ठरू शकते. आज आपण अशाच पाच खेळाडूंबद्द्दल जाणून घेणार आहोत ज्यांना संघात कायम ठेवण्याच्या फ्रँचायझीच्या निर्णयाने सर्वांनाच चकित केले. हे खेळाडू मागील हंगामातच नाही तर तर त्यापूर्वीही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत. (IPL 2021: आयपीएल फ्रँचायझींनी 56 खेळाडूंना केले रिलीज, Release व Retain केलेल्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट; कोणत्या संघाकडे किती रक्कम पहा)

1. दिनेश कार्तिक

माजी केकेआर कर्णधारासाठी आयपीएल 2020 साठी खूप पीडादायक ठरले. कार्तिक बॅटने काही कमाल करण्यात अपयशी ठरलाच त्याच्यावर त्याने अगदी स्पर्धेच्या मध्यभागी इयन मॉर्गनकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली होती. कार्तिकने 14 सामन्यांत 14.08 च्या भयानक सरासरीने 169 धावा जमविल्या. खराब फॉर्म असूनही केकेआरने त्याला आगामी हंगामासाठी तब्बल 7.4 कोटी रुपयात कायम ठेवले असून तो फ्लॉप डील ठरू शकतो.

2. जयदेव उनाडकट

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज गेल्या हंगामात खूप निराशाजनक ठरला. त्याला रॉयल्सच्या गोलंदाजीच्या हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी आणि जोफ्रा आर्चरच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागला. आयपीएल 2020 मधील सात सामन्यात उनाडकटने 228 धावा दिल्या आणि फक्त चार विकेट घेऊ शकला. राजस्थानने त्याला 3 कोटी रुपयांत कायम ठेवले, परंतु उनादकट आयपीएल 2021 मध्ये प्रभाव पडण्याची शक्यता फारच कमी आहे.

3. इमरान ताहिर

2019 आयपीएलच्या पर्पल कॅपचा मान चेन्नई सुपर किंग्सचा फिरकीपटू ताहीर मागील पूर्ण हंगामात बेंचवरच बसून राहिला. त्याला 3 सामने खेळायची संधी मिळाली ज्यात त्याने 1 विकेट काढली. तथापि, सीएसकेने अद्याप युवा खेळाडूंवर गुंतवणूक करण्याऐवजी त्याला 1 कोटी रुपयांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. सीएसकेची ही रणनीती त्यांच्यावर भारी पडू शकते.

4. आंद्रे रसेल

टी-20 क्रिकेटमध्ये रसेलसारख्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अलीकडच्या काही काळात भीती निर्माण झाली आहे, पण रसेलची चमक मागील हंगामात पूर्ण फिकी पडली. आयपीएल 2019 मध्ये रसेलने 204.81 च्या स्ट्राइक-रेटने 510 धावा केल्या. केकेआरने त्याला मागील हंगामात 8.5 कोटी रुपयात कायम ठेवले होते, पण त्याची बॅट शांतची शांतचं राहिली. 10 सामन्यांत त्याने फक्त 117 धावा केल्या. परंतु, त्याचे निराशाजनक फॉर्म आणि दुखापतीची चिंता असूनही केकेआरने रसेलला 8.5 कोटी रुपयांत कायम ठेवले. केकेआरच्या पावलावर असंख्य क्रिकेट तज्ञ आणि चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

5. कुलदीप यादव

2020 मोसमात फक्त पाच सामने खेळूनही कुलदीपने आपले स्थान कायम राखले. प्लेइंग इलेव्हनमधील जागेसाठी त्याला अनेकवेळा संघर्ष करावा लागला. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरही तो फक्त एक वनडे सामना खेळला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. इलेव्हनमधील फिरकीपटू केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती पहिली निवड असेल, अशा परिस्थितीत कोलकाताने यादवला 5.8 कोटी रुपयात कायम ठेवणे हे कितपतयोग्य आहे हे फक्त वेळच सांगेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now