IPL 2020: UAE येथे होणार होणार इंडियन प्रीमियर लीग 13, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली पुष्टी; BCCI ने मागितली सरकारची मंजुरी
"कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल 2020 आता युएईमध्ये होणार आहे आणि आम्ही भारत सरकारच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे."
कोविड-19 दरम्यान बीसीसीआयने (BCCI) मोठ्या प्रमाणात नुकसान टाळण्यासाठी या वर्षाच्या उत्तरार्धात बहुप्रतीक्षित आयपीएल (IPL) 2020 चे आयोजन करण्याचे म्हटले होते. "कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल 2020 आता युएईमध्ये होणार आहे आणि आम्ही भारत सरकारच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. आम्ही आयपीएलच्या जनरल कौन्सिलच्या पुढील कारवाई विषयी चर्चा करू," आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ANI ला माहिती दिली. सोमवारी आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप पुढील वर्षापर्यंत स्थगित केल्यावर सप्टेंबर-नोव्हेंबरच्या विंडोचा उपयोग करुन यावर्षी आयपीएलला संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) स्थानांतरित करण्यासाठी भारतीय बोर्ड तयार आहे. पटेल यांनी यापूर्वी पुष्टी केली होती की आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची दहा दिवसांत बैठक होईल आणि पुढील कार्यवाहीची योजना आखतील. (IPL 2020 Update: लवकरच होणार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक, BCCI करणार भारत सरकारशी चर्चा, जाणून घ्या पूर्ण प्लान)
युएईमध्ये भारताची श्रीमंत टी-20 फ्रँचायझी लीग आयोजित केली जाईल आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या पुढील बैठकीनंतर या विषयी औपचारिक घोषणा केली जाईल यावर पटेल यांनी पुष्टी केली आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. बातमीनुसार आयपीएलच्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाईल. बीसीसीआयने आयपीएल 2020 साठी यजमान देश म्हणून युएईची निवडण्याच्या निर्णयावर गल्फ न्यूजच्या अहवालात म्हटले. पटेल यांनी गल्फ न्यूजला सांगितले की, ‘‘आमच्यासाठी क्लिनर हा होता की युएईकडे तेथे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. हॉटेलची विस्तृत निवड आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2014 मध्ये एकदा त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे त्यांना आमच्या अपेक्षांची कल्पना आहे.”
दुसरीकडे, आयसीसीच्या घोषणेपूर्वीच फ्रँचायझी आयपीएलच्या त्यांच्या योजनांवर काम सुरु केले होते. तथापि, कोरोना काळात बहुतेक भारतीय खेळाडूंना स्वत:ला प्रशिक्षित करण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल फ्रँचायझींना आपल्या खेळाडूंना लयीत परत येण्यासाठी किमान तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. दरम्यान, परदेशी खेळाडूंचे त्यांच्या देशांमधून थेट युएईमध्ये उड्डाण केले जाण्याची शक्यता आहे.