IPL 2020 Update: आयपीएल 13 पूर्वी क्वारंटाइनने शिखर धवन त्रस्त, 'सो गया ये जहां' गाण्याने मांडली व्यथा (Watch Video)

प्रोटोकॉलनुसार प्रत्येकाला क्वारंटाइन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. आणि शिखर धवन यामुळे वैतागलेला दिसत आहेत. म्हणूनच शिखरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यासह त्याने आपली व्यथा मांडली. या व्हिडीओमध्ये धवन क्वारंटाइन कालावधी लवकर संपवावा आणि त्यांनी आयपीएल खेळावे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

शिखर धवन क्वारंटाइन (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) बहुतेक संघ युएईमध्ये पोहोचले आहेत, जिथे आयपीएल (IPL) 2020 19 सप्टेंबरपासून होणार आहे. आयपीएलच्या 8 संघांपैकी दिल्ली कॅपिटलची (Delhi Capitals) टीम सध्या मुंबईत आहे, जिथून आज किंवा उद्या युएईसाठी रवाना होईल. तिथे खेळाडूंच्या आरोग्यासाठी तयार केलेल्या प्रोटोकॉलनुसार प्रत्येकाला क्वारंटाइन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यामुळे वैतागलेला दिसत आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा सलामी फलंदाज धवन आयपीएलसाठी (IPL) युएईला जा(UAE) ण्यापूर्वी इतर खेळाडूंसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबला आहेत. सर्व खेळाडू एकाच हॉटेलमध्ये आहेत, परंतु धवनला क्वारंटाइनची चिंता आहे, पण आयपीएल खेळण्याचा उत्साह देखील त्याच्यात आहे. म्हणूनच शिखरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यासह त्याने आपली व्यथा मांडली. या व्हिडीओमध्ये धवन क्वारंटाइन कालावधी लवकर संपवावा आणि त्यांनी आयपीएल खेळावे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. (IPL 2020 Update: UAE प्रवासादरम्यान एमएस धोनीने इकॉनॉमी क्लासच्या व्यक्तीसोबत बदलली आपली बिझिनेस क्लास सीट, विनम्रतेने जिंकली Netizens ची मनं Watch Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या धवनच्या व्हिडिओमध्ये शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले गाणे 'सो गया ये जहां' हे ऐकले जाऊ शकते. धवन या गाण्यावर अभिनय करीत आहे आणि व्हिडिओमध्ये तो जमिनीवर झोपलेला दिसतोय. अशाप्रकारे धवन क्वारंटाइनने वैतागला असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'गब्बर' धवनने लिहिले की, "आयपीएलपूर्वी क्वारंटाइन."

 

View this post on Instagram

 

Quarantine before IPL 😜🤪😀😀😀

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

दिल्लीच्या कॅपिटल्सचे सर्व खेळाडू सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये जमले आहेत, तर उर्वरित संघ युएईमध्ये पोहोचले आहेत. आयपीएलच्या या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ युएईमध्ये प्रथम उतरला होता. खेळाडूंना युएईमध्ये 6 क्वारंटाइन राहावे लागणार आहे जिथे प्रत्येकासाठी 3 कोरोना टेस्ट केल्या जातील. यानंतर, सर्व संघांचे खेळाडू सुमारे 3 आठवडे सराव करतील आणि त्यानंतर आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif