IPL 2020 Update: UAE येथे आयपीएलला सरकारची तत्त्वत: मान्यता, बीसीसीआयचा दावा; फ्रँचायझींकडून खेळाडूंची क्वारंटाइन प्रक्रिया सुरू

इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) यावर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे नेण्यासाठी बीसीसीआयला "तत्त्वानुसार" सरकारची मान्यता मिळाली आहे आणि आठ फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना क्वारंटाइन आणि कोविड-19 टेस्ट प्रोटोकॉलच्या प्रक्रियेची तयारी सुरु केली आहे, बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले

मुंबई इंडियन्स (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमिअर लीगला (Indian Premier League) यावर्षी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे नेण्यासाठी बीसीसीआयला "तत्त्वानुसार" सरकारची मान्यता मिळाली आहे आणि आठ फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना क्वारंटाइन आणि कोविड-19 टेस्ट (COVID-19 Test) प्रोटोकॉलच्या प्रक्रियेची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, लेखी परवानगी पुढील काही दिवसांत येऊ शकेल. “आम्हाला पुढे जाण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे आणि कागदपत्रे कधीही येतील,” एका शीर्ष सूत्रांनी सांगितले. बीसीसीआयच्या आदेशानुसार 20 ऑगस्टनंतर फ्रेंचायझी रवाना होतील, तर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) 22 ऑगस्टला रवाना होणार आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आपल्या बेस भारतीय खेळाडूंना क्वारंटाइन ठेवले आहे. युएईला जाण्यापूर्वी काही संघांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा बेंगळूरु येथून अमिरातीकडे प्रस्थान करण्यापूर्वी त्या शहरांतच कोविड-19 टेस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. (IPL 2020 Title Sponsorship: आयपीएल च्या यंदाच्या टायटल स्पॉन्सरशीप साठी Amazon, Unacademy, Jio ची नावं चर्चेत)

“जर त्यांच्याकडे पीसीआर-टेस्ट असेल आणि नकारात्मक अहवाल मिळाला असेल तर हे चांगले आहे. बीएसीसीआय एसओपीचा उल्लेख केल्याने आम्ही युएईला जाण्यापूर्वी 24 तासांच्या अंतरावर दोन टेस्ट केल्या पाहिजेत,” फ्रॅंचायझीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. "दोन चाचण्या अनिवार्य असताना बहुतेक फ्रँचायझींनी भारत सोडण्यापूर्वी किमान चार चाचण्या केल्या पाहिजेत," त्याने पुढे म्हटले. बायो-बबलमध्येच राहण्याच्या अटीवर खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांनात्यांच्या कुटुंबियांना सोबत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, कडक क्वारंटाइन प्रोटोकॉलमुळे संघातील खेळाडू खूप उत्सुक नाहीत अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, जोपर्यंत राहण्याचा प्रश्न आहे, एक फ्रँचायझी रिसॉर्ट बुक करण्याची व्यस्था करत आहे. 2014 च्या आवृत्तीत अबू धाबीमध्ये हॉटेलची बुकिंग करणारी आणखी एक फ्रेंचायझी आहे. संघात खेळाडूंची संख्या 24 पर्यंत मर्यादित असली तरी बीसीसीआयने सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी कॅप निश्चित केलेली नाही. दर पाचव्या दिवशी कोविड-19 टेस्ट आणि खेळाडूंच्या आरोग्य तपासणीसाठी पूर्ण वाढीव वैद्यकीय पथकासह काही फ्रॅन्चायझींत 60 लोकांचा समावेश आहे.