IPL 2020 Update: क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर! 26 सप्टेंबरपासून सुरु होऊ शकतो आयपीएलचा थरार, 'या' दोन शहरांमध्ये आयोजित केले जाऊ शकतात सर्व सामने

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल 2020 चे आयोजन 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान करू शकेल. अहवालानुसार, बंगालरू आणि चेन्नईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी विचार केला जात आहे, जेथे पावसाळा इतका तीव्र नसतो.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा नवीन हंगाम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित केला करण्यात आली. आयपीएल (IPL) 2020 ची सुरुवात यावर्षी 29 मार्चपासून सुरू होणार होती, परंतु केंद्र सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनचा पहिला टप्पा लागू केल्यानंतर ही स्पर्धा 15 एप्रिलला पुढे ढकलण्यात आली. सरकारने एप्रिलमध्ये लॉकडाऊन वाढवल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. आयपीएल, जगातील सर्वात लोकप्रिय टूर्नामेंटपैकी एक आहे आणि बुंदेस्लिगा, सेरी ए आणि ला लीगासारख्या मोठ्या खेळाच्या स्पर्धा सुरू झाल्यामुळे या स्पर्धेचे भवितव्य जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आणि आता असे कळले आहे की बीसीसीआय या वर्षाच्या अखेरीस प्रीमिअर टी-20 लीग आयोजित करण्याची योजना आखत आहे. मुंबई मिररच्या (Mumbai Mirror) वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल 2020 चे आयोजन 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान करू शकेल. (BCCI पैशांसाठी करतेय IPL 2020 च्या आयोजनाचा अट्टाहास? कोरोना काळात देशाला फायदा होणारा असल्याचे कोषाध्यक्ष अरुण धूमलचा दावा, पाहा काय म्हणाले)

अहवालानुसार, बंगालरू आणि चेन्नईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी विचार केला जात आहे, जेथे पावसाळा इतका तीव्र नसतो. अधिक स्टेडियम आणि हॉटेल्सशी चांगला संपर्क साधल्यामुळे मुंबई देखील विचारात घेण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्रात कोविड-19 प्रकरणांची झपाट्याने वाढ होत आहे, मुंबईमध्ये आयपीएल आयोजित होण्याची शक्यता नाही. स्पर्धा आयोजित होत असल्यास सर्व खेळाडू आणि कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी बीसीसीआय कडक मार्गदर्शक सूचना जारी करेल. हॉटेल्सचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले जाईल आणि चार्टर फ्लाइट स्टँडबाईवर राहतील. रिक्त स्टेडियममध्ये सामने आयोजक केले जातील. मात्र, बीसीसीआयने अद्याप आपल्या नव्या वेळापत्रकांसंदर्भात अधिकृतपणे कोणतेही निवेदन दिले नाही.

दुसरीकडे, जर आयपीएल 2020 रद्द झाल्यास बीसीसीआयला 4,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल, ज्यामुळे मंडळाच्या वित्तपुरवठ्याला मोठा फटका बसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif