IPL 13: कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात 'या' 5 खेळाडूंनी केला तडाखा, खेळला तुफानी डाव; लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश
जगभरात प्रसिद्ध असलेल्या या टी-20 लीगमध्ये कर्णधारांकडून मोठ्या अपेक्षा असताना. मात्र, तुम्हाला माहित आहे यापैकी असे काही कर्णधार आहेत ज्यांना कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या प्रभाव पाडण्यात अपयश आले तर काहींनी मिळालेल्या संधीच सोनं केलं. या खेळाडूंच्या टॉप-5 लिस्टमध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
क्रिकेट आणि त्यामध्ये भारतीय टी-20 लीग (Indian Premier League) हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये कधी काय होईल कोणालाही सांगता येत नाही. इथे रेकॉर्ड बनवणे आणि तोडणे सामान्य गोष्ट आहे. स्पर्धेत सर्वाधिक शतक करणारा खेळाडूही पुढील सामन्यात फ्लॉप ठरू शकतो, तर एखादा खेळाडू ज्याच्याकडून अपेक्षा नाही तो देखील एका सामन्यात मॅच-विनर म्हणून उदयास येतो. आयपीएलच्या (IPL) मागील 12 हंगामात चाहत्यांना फलंदाजी आणि गोलंदाजांकडून अनेक प्रभावी खेळी पाहायला मिळाल्या आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या टी-20 लीगमध्ये कर्णधारांकडून मोठ्या अपेक्षा असताना. क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध खेळाडू-एमएस धोनी, विराट कोहली, डेविड वॉर्नरसारखे खेळाडू आयपीएल संघांचे (IPL Teams) नेतृत्व करत आहेत. मात्र, तुम्हाला माहित आहे यापैकी असे काही कर्णधार आहेत ज्यांना कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या प्रभाव पाडण्यात अपयश आले तर काहींनी मिळालेल्या संधीच सोनं केलं. (IPL 2020 Playoffs, Final Schedule: BCCI कडून आयपीएल 13 चे प्ले ऑफ, महिला आयपीएल वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स)
आज आपण जाणून घेणार आहोत अशाच काही खेळाडूंबद्दल ज्यांनी कर्णधार म्हणून त्यांच्या पहिल्या सामन्यात धमाकेदार डाव खेळला. या खेळाडूंच्या टॉप-5 लिस्टमध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश असून पहिले स्थानही भारतीय क्रिकेटपटूनेच पटकावलं आहे.
1. श्रेयस अय्यर
आयपीएल 2018च्या मध्यभागी माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडल्यावर 25 एप्रिल 2018 रोजी श्रेयस अय्यरला टीमचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर, श्रेयस 27 एप्रिल रोजी कोलकाताविरुद्ध संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला. कर्णधारपदाच्या पहिल्या डावात श्रेयसने अवघ्या 40 चेंडूत 93 धावांची नाबाद खेळी केली. या दरम्यान श्रेयसने 3 चौकार आणि 10 षटकार लगावले.
2. कीरोन पोलार्ड
10 एप्रिल 2019 रोजी पंजाबविरुद्ध रोहित शर्माच्या दुखापतीमुळे पोलार्डला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले होते. त्यावेळी, इंडियन टी-20 लीगमध्ये पोलार्डने प्रथमच मुंबईची कर्णधारपदाची धुरा सांभाळली. या सामन्यात पंजाबने मुंबईला 198 धावांचे लक्ष्य दिले होते आणि पोलार्डने चौथ्या स्थानावर फलंदाजी करत 31 चेंडूत 3 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 83 धावा केल्या.
3. आरोन फिंच
21 एप्रिल 2013 रोजी पंजाबविरुद्ध सामन्यात फिंचला पुणे वॉरियर्सचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. माइकल क्लार्कच्या जागी फिंचला जबाबदारी देण्यात आली होती. फिंचने प्रथमच पुणे वॉरियर्स इंडियाचे नेतृत्व केले आणि 8 चौकार व 2 षटकाराच्या मदतीने 42 चेंडूत 64 धावा केल्या.
4. मुरली विजय
विजयला डेविड मिलरच्या जागी किंग्स इलेव्हन पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 2016मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध सामन्यात त्याने पंजाबचे नेतृत्व केले होते. या सामन्यात विजयने कर्णधार म्हणून 41 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या.
5. अॅडम गिलक्रिस्ट
या यादीत पाचव्या स्थानावर डेक्कन चार्जर्सचे माजी कर्णधार गिलक्रिस्ट यांचा समावेश होतो. 2008 मध्ये गिलख्रिस्टला डेक्कन चार्जर्स संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामन्यात त्याने 6 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या.
दरम्यान, यापैकी श्रेयस आणि पोलार्ड अद्यापही आयपीएल खेळत असून अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहेत. श्रेयस दिल्लीचा नियमित कर्णधार असून पोलार्ड सध्या रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्व करत आहेत. शिवाय, दोन्ही कर्णधार-फलंदाजांवर संघाला यंदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्याचे मोठे आव्हान आहे.