IPL 2020: आयपीएल यंदा होऊ नये यासाठी माजी ICC अध्यक्ष शशांक मनोहर करत होते प्रयत्न, माजी पाकिस्तानी क्रिकेटर बसित अलीचा धक्कादायक दावा

त्यांच्या मते, यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) व्हावा अशी शशांक यांची इच्छा नव्हती. दरम्यान, आयसीसीला हा कार्यक्रम पुढे ढकलण्यास भाग पाडण्यासाठी बरेच जण आता भारतीय बोर्डावर निशाणा साधत आहेत.

शशांक मनोहर (Photo Credit: Getty)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अखेर या आठवड्याच्या सुरूवातीस टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या परिस्थितीत मेगा स्पर्धेचे आयोजन करणे त्यांच्यासाठी अवास्तव असेल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केल्यावरही अनेक बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पण, आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर (Shashank Manohar) यांच्यामुळे टी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याच्या निर्णयाला उशीर झाल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अलीने उघड केले आहे. त्यांच्या मते, यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) व्हावा अशी शशांक यांची इच्छा नव्हती. आयपीएलची सुरुवात यंदा मार्च महिन्यात होणार होती, पण कोविड-19 च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, आयसीसीला हा कार्यक्रम पुढे ढकलण्यास भाग पाडण्यासाठी बरेच जण आता भारतीय बोर्डावर निशाणा साधत आहेत. परंतु जर बासित अलीवर विश्वास ठेवायचे तर यात बीसीसीआयचा (BCCI) दोष नाही कारण विश्वचषकच्या ऐवजी आयपीएलच्या विरोधात असल्याने मनोहर यांनी हा निर्णय लांबविला. ('IPL 2020 साठी टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलले', ‘मँकेगेट’चा संदर्भ देत 'या' पाकिस्तानी खेळाडूने BCCI, क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केला आरोप)

शशांक मनोहर (आयसीसीचे माजी अध्यक्ष) यांची ही एक युक्ती होती, वर्ल्ड कप एक-दीड महिन्यांपूर्वी पुढे ढकलला गेला असता, भारतीय प्रेक्षकांना वाईट वाटेल, आयपीएल व्हावा अशी त्याची इच्छा नव्हती. हे माझे मत आहे, मी हे यापूर्वीही सांगितले आहे. त्यांनी उशीर करण्याचा डावपेच खेळला,” आपल्या युट्यूब वाहिनीशी बोलताना बासित म्हणाले. यावर्षी टी-20 विश्वचषक पुढे ढकलण्यासाठी बीसीसीआयवर अन्यायकारकपणे दोषारोप केले जात असल्याचेही बासित अली यांनी सांगितले. आयसीसीच्या बैठकीत बंद दारा मागे काय घडले याची बहुतेकांना माहिती नसल्याचेही 49 वर्षीय माजी क्रिकेटपटूने म्हटले.

“सोशल मीडिया आणि चॅनेल्समध्ये चर्चा झाली, अगदी मला कॉलही आले पण मी उत्तर देण्यास नकार दिला की, बीसीसीआयने इतका दबाव टाकला आहे की वर्ल्ड कप पुढे ढकलला गेला आणि आयपीएल होण्याकरिता आशिया चषक थांबवला. पण, वास्तविकपणे आयसीसीच्या बैठकीत काय चर्चा झाली याची अंतर्गत कथा लोकांना माहिती नाही. टी-20 विश्वचषक यंदा होणार नाही हे आधीच माहित होते कारण ऑस्ट्रेलियाने यापूर्वी या स्पर्धेचे आयोजन करण्यास नकार दिला होता.” शिवाय टी-20 विश्वचषक स्पर्धेबद्दल आयसीसीचा अंतिम निर्णयही मनोहर यांनी राजीनामा दिल्यावर जाहीर करण्यात आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif