IPL 2020 Schedule of Mumbai Indians: चेन्नई सुपर किंग्स सोबतच्या पहिल्या सामन्यासह जाणून घ्या मुंबई इंडियन्स आयपीएल संघाचे संपूर्ण वेळापत्रक
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाचे लक्ष या वेळी पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यावर असेल. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मंबई इंडियन्स संघाने या आधी 2013, 2015, 2017 आणि 2019 असे सलग 4 वेळा आयपीएलवर नाव कोरले आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL 2020) स्पर्धेची घोषणा झाली आहे. त्यानुसार आयपईएल क्रिकेट संघ आणि त्यासोबत या संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. येत्या 29 मार्च या दिवशी गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघामध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याच्या रुपात स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आयपीएल स्पर्धेचे हे 13 वे वर्ष आहे. आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने अंतिम सामन्यात सीएसके संघाला पराभूत करत आयपीएल किताब जिंकला होता. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाचे लक्ष या वेळी पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यावर असेल. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मंबई इंडियन्स संघाने या आधी 2013, 2015, 2017 आणि 2019 असे सलग 4 वेळा आयपीएलवर नाव कोरले आहे.
आयपीएल 2020 मुंबई इंडियन्स संघ संपूर्ण वेळापत्रक
मुंबईतील घरच्या मैदानावर खेळले जाणारे सामने
- 29 मार्च, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स
- 5 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
- 15 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स
- 20 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेवन पंजाब
- 28 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्स
- 1 मे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कैपिटल्स
- 9 मे, मुंबई इंडियन्स आणि सनराइजर्स हैदराबाद
मुंबई शहराबाहेर खेळले जाणारे मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक
- 1 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि सनराइजर्स हैदराबाद
- 8 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेवन पंजाब
- 12 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्स
- 24 एप्रिल, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स
- 6 मे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कैपिटल्स
- 11 मे, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स
- 17 मे, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर.
मुंबई इंडियन्स ट्विट
मुंबई इंडियन्स आयपीएल संघ
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चाहर, अनमोलप्रीत सिंह, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, क्विंटन डिकॉक, कीरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिशेल मैकक्लाघेन, क्रिस लिन, सौरभ तिवारी, नाथन कूल्टर नाइल, मोसिन खान, दिग्विजय देशमुख.
आयपीएल लिलाव 2020 मध्ये मंबई इंडियन्स संघाने क्रिस लिन या धडाकेबाज फलंदाजाला खरेदी केले आहे. तसेच, नाथन कूल्टर यालाही बॅकअप पेसरच्या रुपात आपल्या टीममध्ये घेतले आहे. मुंबई इंडीयन्स संघाने सौरभ तिवारी याला 50 लाख, मोसिन खान (20 लाख) आणि दिग्विजय देशमुख याला 20 लाख रुपयांनी खरेदी केले आहे. मुंबईने खास करुन युवा खेळाडूंवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या संघात ऑलराउंडर प्रिन्स बलवंत याचाही समावेश आहे.