IPL 2020 पूर्वी CSK सराव सत्रात एमएस धोनी, सुरेश रैना यांनी ठोकले षटकार, चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला Unseen व्हिडिओ

व्हिडिओच्या सुरुवातीला मुरली विजय, धोनी, हरभजन सिंह खेळाडू सराव करताना दिसतात आणि काही जण नेटमध्ये घाम गाळताना दिसले.

एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credits: Twitter)

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) क्रीडा विश्वातील सर्व स्पर्धा/मालिका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात भारतातील प्रसिद्ध टी-20 स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) समावेश आहे. 29 मार्चपासून सुरु होणारा टूर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत स्थगिती करण्यात आला आहे. 21 दिवस भारतात लॉकडाउन असताना आयपीएल (IPL) संघांचे एडमिन चाहत्यांना त्यांच्या सोशल पेजवर आकर्षित करण्याची पूर्ण खात्री घेत आहे. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एमएस धोनी आणि सुरेश रैना सराव सामन्यादरम्यान उंच षटकार मारताना दिसत आहे. आयपीएल पुढे ढकल्याने चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) सराव सत्रही रद्द करण्यात आल्याने सर्व खेळाडू घरी परतले आणि लॉकडाउन दरम्यान घरच्यांसबत वेळ घालवत आहे. (IPL मध्ये RCB च्या पराभवाचे कारण ते आवडता बॅटिंग पार्टनर; केविन पीटरसनसोबत इंस्टाग्राम लाईव्ह दरम्यान विराट कोहलीने केले महत्वाचे खुलासे)

व्हिडिओच्या सुरुवातीला मुरली विजय, धोनी, हरभजन सिंह खेळाडू सराव करताना दिसतात आणि काही जण नेटमध्ये घाम गाळताना दिसले. 4 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये धोनी सुरेश रैनासमवेत मोठे षटकार ठोकताना दिसत आहे. 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलच्या रूपात अखेरचा सामना खेळल्या धोनीने क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली होती आणि आयपीएलद्वारे तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. पाहा व्हिडिओ:

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआय एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यानंतर बैठक घेऊन लीगच्या आयोजनावर निर्णय घेईल. भारतात 21 दिवसांचा लॉकडाउन 14 एप्रिल रोजी समाप्त होईल. एनबीए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला लीगा, बुंडेस्लिगासह जगभरातील क्रीडा स्पर्धा कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे थांबविण्यात आल्या आहेत. तथापि, स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात सहभागाची पुष्टी केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif