IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग 13 साठी चेन्नई सुपर किंग्स सज्ज, हबीबी मोडमधील एमएस धोनी आणि टीमचा फोटो केला शेअर (See Pic)
चेन्नईने ट्विटरवर कर्णधार एमएस धोनी आणि टीमचा फोटो पोस्ट केला आणि मजेदार कॅप्शन देत लिहिले की, "जेव्हा आपली दुबई योजना पुढे ढकलली जाते परंतु आपण आधीच हबीबी मोडमध्ये आहात."
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि चाहत्यांसोबत फ्रँचायझी व खेळाडूही आगामी हंगामासाठी उत्सुक आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) यंदा आयपीएलचे (IPL) हंगाम आयोजित करण्याच्या नुकत्याच झालेल्या घोषणेने आयपीएल फ्रँचायझी आणि चाहत्यांना आनंदाने भरले आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी स्पर्धार कोविड-19 च्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आली आणि आता अखेरीस स्पर्धा आयोजित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेव्हापासून ही घोषणा झाली, तेव्हापासून प्रत्येक आयपीएल फ्रँचायझी (IPL Franchise) त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत आहेत जेणेकरून जगातील नामांकित क्रिकेट लीगच्या तेराव्या आवृत्तीबाबत प्रेक्षकांचा उत्साह वाढेल. आयपीएल 2019 मधील उपविजेते आणि तीन वेळा चॅम्पियन असणार्या चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) हबीबी मोडमध्ये व्हिसल पोडू टीमचा फोटो पोस्ट केला. (IPL 2020 Update: आयपीएल 13 साठी रिषभ पंतची जय्यत तयारी, एमएस धोनी सारखा मारतोय हेलिकॉप्टर शॉट Watch Video)
आठ वेळच्या अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर कर्णधार एमएस धोनी आणि टीमचा फोटो पोस्ट केला आणि मजेदार कॅप्शन देत लिहिले की, "जेव्हा आपली दुबई योजना पुढे ढकलली जाते परंतु आपण आधीच हबीबी मोडमध्ये आहात." या कॅप्शनचा सरळ इशारा आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या निर्णयाकडे जातो ज्याने फ्रँचायझींना 20 ऑगस्टनंतर दुबई येथे रवाना होण्यास सांगितले आहे. मात्र, चेन्नई टीम 20 ऑगस्टपूर्वीच युएईला रवाना होणार असल्यानेगव्हर्निंग कौन्सिलच्या निर्णयाचा त्यांना चांगलाच फटका बसला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे ट्विट:
आयपीएलमध्ये यंदा दुपारी एकूण 10 सामने खेळले जातील जे 3:30 वाजता सुरू होतील तर संध्याकाळचे सामने 7:30 वाजता सुरू होतील. सर्व 8 संघ 10 नोव्हेंबर रोजी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे सर्व सामने आयोजित केले जातील.