IPL 2020: देवदत्त पडिक्कल ते रवी बिश्नोई; 13व्या हंगामात 'या' युवा खेळाडूंनी केले डेब्यू; कोणी फ्लॉप तर कोणी गाजवतंय मैदान

यापैकी काही जण फ्लॉप झाले तर काही मैदान मारत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून देवदत्त पडिक्कल, किंग्स इलेव्हन पंजाबकडून रवी बिश्नोई, राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जयस्वाल, सनरायझर्स हैदराबादसाठी प्रियम गर्ग अशा केही युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये पदार्पण केले.

देवदत्त पड्डीकल-रवी बिश्नोई (Photo Credit: Instagram)

IPL 2020 Debutants: इंडियन प्रीमिअर लीग 2020 आता त्याच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. आयपीएलचं 13वं सत्र अपेक्षेप्रमाणे सर्वांचे चांगले मनोरंजन करत आहेत. आयपीलमध्ये आजवर 47 सामने झाले आहेत आणि यापैकी अनेक सामन्यात नाट्यमय बदल पाहायला मिळाले आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये धावांचा आणि विकेटचा पाऊस पडत आहे. यावेळी, काही संघांमध्ये आयपीएलचा अनुभव असलेल्या काही खेळाडूंसह काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळाली आहेत. यापैकी काही जण फ्लॉप झाले तर काही मैदान मारत आहे. क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना अद्याप खेळण्याची संधी मिळाली नाही पण सध्या सुरु असलेल्या 13व्या हंगामात काही युवा खेळाडूंनी पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या खेळाडूंसोबत आपला खेळ दाखवला. (IPL 13: कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात 'या' 5 खेळाडूंनी केला तडाखा, खेळला तुफानी डाव; लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून देवदत्त पडिक्कल, किंग्स इलेव्हन पंजाबकडून रवी बिश्नोई, राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जयस्वाल, सनरायझर्स हैदराबादसाठी भारताचा अंडर-19 वर्ल्ड कप कर्णधार प्रियम गर्ग, चेन्नई सुपर किंग्ससाठी रुतुराज गायकवाड अशा केही युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये पदार्पण केले. यापैकी काही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले तर काहींनी मैदान गाजवलं. आरसीबीच्या देवदत्तने आजवर 11 आयपीएलसमाने खेळले आणि तीन अर्धशतकांसह 343 धावा केल्या. देवदत्तने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचसह डावाची सुरुवात करत बेंगलोरला चांगली सुरुवात करून देण्याची भूमिका बजावली जे आरसीबीच्या विजयाचे एक कारण आहे. हैदराबादसाठी प्रियम गर्गने मधल्या फळीत फलंदाजी करत एका सामन्यात मॅच-फिनिशरची भूमिका बजावली. त्याने 11 सामन्यात 15.57च्या सरासरीने 109 धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

शिवाय, राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जयस्वाल 3 सामन्यात झळकला आणि त्याने 90 धावा केल्या. सीएसकेसाठी रुतुराज गायकवाडने पदार्पण केले. अंबाती रायुडूच्या जागी सीएसके प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या रुतुराजला त्याचा फायदा करून घेता आला आणि खराब फलंदाजीमुळे नंतरच्या काही सामन्यांमध्ये बाहेर बसावे लागले. त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात संधी मिळाली, पण इथे देखील तो फ्लॉप ठरला. मात्र, आरसीबीविरुद्ध त्याला सूर गवसला आणि नाबाद 65 धावा ठोकल्या. रुतुराजने 4 आयपीएल सामन्यांमध्ये 70 धावा केल्या. दुसरीकडे, पंजाबसाठी डेब्यू केलेला रवी बिश्नोई देखील प्रभावी कामगिरी करताना दिसला. बिश्नोईला 12 सामन्यात पंजाबने संधी दिली आणि त्याने 7.20च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट काढल्या. बिश्नोई पंजाबच्या गोलंदाजी टीमचा नियमित सदस्य बनला असून पंजाबला प्ले ऑफच्या दिशेने नेण्यासाठी आपल्या फिरकीची कमाल दाखवत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif