IPL 2019 मधील पहिल्या सामन्याच्या कमाईतून 'चेन्नई सुपर किंग्स' करणार पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत
चेन्नई सुपर किंग्ज या टीमने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आयपीएलच्या पहिल्या सामन्याचं उत्पन्न पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.
23 मार्चपासून आयपीएलची (IPL 2019) धूम सुरु होत आहे. यंदा आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असून त्याची रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. त्यानंतर आता चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या टीमने देखील असाच एक उदार निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्याचं उत्पन्न पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात येईल. IPL 2019 चा उद्घाटन सोहळा रद्द; पुलवामा हल्ल्यातील शहीद कुटुंबांना दान करणार रक्कम- BCCI
चेन्नई सुपर किंग्ज टीमचे संचालक राकेश सिंग यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "चेन्नई सुपर किंग्ज संघाची पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत 23 मार्चला होणार आहे. या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाईल."
ANI ट्विट:
23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर रात्री आठ वाजता रंगणार आहे. पहिल्या दिवशी काही तासांतच या सामन्याची सर्व तिकीटे विकली गेली आहेत.