क्रिकेटर Hardik Pandya याची पत्नी Natasa Stankovic चे ख्रिसमस पार्टीच्या फोटोत दिसले बेबी बंप? युजर्संनी दिल्या अशा प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविच (Natasa Stankovic) यांनी नुकतेच ख्रिसमस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या पार्टीला काही जवळच्या मित्रांनी आणि घरातील मंडळींनी उपस्थितीती लावल्याचे दिसून आले.

क्रिकेटर Hardik Pandya याची पत्नी Natasa Stankovic चे ख्रिसमस पार्टीच्या फोटोत दिसले बेबी बंप? युजर्संनी दिल्या अशा प्रतिक्रिया
Hardik Pandya and Natasa Stankovic (Photo Credits-Instagram)

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविच (Natasa Stankovic) यांनी नुकतेच ख्रिसमस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या पार्टीला काही जवळच्या मित्रांनी आणि घरातील मंडळींनी उपस्थितीती लावल्याचे दिसून आले. याचे फोटो हार्दिक याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत सर्वांना ख्रिसमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु हे फोटो शेअर केल्यानंतर आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे हार्दिकची बायको नताशा हिचे फोटोत बेबी बंप दिसून येत आहे. त्यामुळे आता युजर्सकडून विविध प्रश्न विचारले जात आहेत.

हार्दिक पांड्याने हे फोटो शेअर केल्याने युजर्सकडून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात झाली. एका युजर्सने हार्दिक दुसऱ्यांदा बाबा होणार का याचा अंदाज लावला आहे. तर अन्य एका युजर्सने हार्दिकच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे म्हटले आहे.(Virat Kohli Praises 83: क्रिकेटवर आधारित 83 चित्रपट पाहिल्यानंतर विराटने केले रणवीर सिंहचे कौतुक)

दरम्यान, हार्दिक आणि नताशा यांनी 31 मे 2020 रोजी लग्न केले होते. त्यानंतर 30 जुलै मध्ये हार्दिक प्रथम बाबा झाला होता. पण आता शेअर केलेल्या फोटोंवरुन खरच हार्दिककडे गुड न्यूज आहे का यावर जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 04:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).