Yashasvi Jaiswal, ICC Test Ranking: यशस्वीची ICC Ranking मध्ये हनुमान उडी, रोहित शर्मालाही टाकले मागे
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत (IND vs ENG) दोन द्विशतकं ठोकणाऱ्या यशस्वी जायस्वालला (Yashasvi Jaiswal) आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking ) मोठा फायदा झालाय. आयसीसी क्रमवारीमध्ये यशस्वी जायस्वाल यांनी हनुमान उडी घेतली आहे. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे. अवघ्या आठ कसोटी सामन्यानंतर यशस्वी जायस्वाल यानं टॉप 15 फलंदाजामध्ये स्थान पटकावलं आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वी जायस्वाल यानं 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहली आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा - KL Rahul Injury Update: केएल राहुल उपचारासाठी लंडनला रवाना, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह)
पाहा पोस्ट -
यशस्वी जायस्वाल याच्या नावावर 727 रेटिंग गुण आहेत. तर विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. दरम्यान कसोटी क्रमवारीत टॉप 5 फलंदाजांच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर विराजमान आहे. विल्यमसनच्या नावावर 893 रेटिंग गुण आहेत. तर 818 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाज कोणत्या क्रमांकावर ?
विराट कोहली - 9
यशस्वी जायस्वाल - 12
रोहित शर्मा - 13
ऋषभ पंत - 14
शुभमन गिल - 31
रवींद्र जाडेजा - 37
इंग्लंडविरोधात भारताने 3-1 कसोटी मालिकेत आघाडी घेतली आहे. भारताने मालिका जिंकण्यामध्ये यशस्वी जायस्वाल याचा सिंहाचा वाटा आहे. चार कसोटी सामन्यात यशस्वी जायस्वाल यानं आठ डावामध्ये त्याने 94 च्या सरासरीने 655 धावा केल्या आहेत.