India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: भारतीय महिला संघाचा 150 धावांनी दणदणीत विजय; अवघ्या 58 धावसंख्येवर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ आऊट

भारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ आमनेसामने होते. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला गेला. भारतीय महिला संघाने स्कॉटलंडवर 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: भारतीय महिला संघाचा 150 धावांनी दणदणीत विजय; अवघ्या 58 धावसंख्येवर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ आऊट
PC-X

India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: आयसीसी महिला अंडर 19 टी-20 विश्वचषक 2025 च्या आजच्या सामन्यात मंगळवारी 28 जानेवारी रोजी भारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघाशी (IND-W vs SCO-W) सामना पार पडला. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला गेला. रविवार, 26 जानेवारी रोजी सुपर सिक्स सामन्यात भारताने बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले होते. आता भारताने स्कॉटलंड महिला अंडर 19 संघाला पराभूत केले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील संघाने मंगळवारीस्पर्धेत आपला विजयी लय कायम ठेवला.

भारतासाठी, गोंगाडी त्रिशा आणि वैष्णवी शर्मा यांनी आतापर्यंत अनुक्रमे बॅट आणि बॉलने त्यांच्या कामगिरीने अनेकांची मने जिंकली होती त्यांनी ती आजही कायम ठेवली. स्कॉटलंड महिला संघाने नाणेफेक जिंकूण गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावर भारताच्या फलंदाजांनी स्कॉटलंडच्या खेळाडूंचा अक्षरश: घाम काढला.

अवघा 1 बळी देत भरताने स्कॉटलंड पुढे 209 धावांचा मोठा डोंगर उभा केला. जी कमलिनीने अर्धशतक करत मैसी मॅसेरा हिच्या गोलंदाजी वर आऊट झाली. तर गोंगडी त्रिशाची झुंजार शतकी खेळी केली. गोंगडी त्रिशाने शतकी खेळी करत तिच्या नावे मोठा विक्रामाची नोंद केली आहे. महिला अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

त्रिशाने 56 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 13 चौकारांच्या जोरावर 110 धावा केल्या. तिच्या नंतर जी कमालिनी हिने सामन्यात अर्धशतक झळकावले. महिला अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघ आत्तापर्यंत सर्वात मजबूत संघ राहिला आहे. भारतासाठी त्रिशा आणि वैष्णवीने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर आयुषी शुक्लाने चार विकेट घेतल्या.

स्कॉटलंडसाठी पिप्पा केली, एम्मा वॉल्सिंगहॅम यांनी सर्वाधिक 12 धावा केल्या. त्याशिवाय, कोणतीही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. 14 षटकांत स्कॉटलंड संपूर्ण संघ तंबूत गेला होता.

संघांचे खेळाडू

भारत महिला अंडर 19 संघ: गोंगडी त्रिशा, जी कमलिनी (विकेटकीपर), सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्ही जे, शबनम मो. शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, भाविका अहिरे, धृतीश के, यानंद केश, यानीश

स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ: पिप्पा केली, एम्मा वॉल्सिंगहॅम, पिप्पा स्प्रॉल (विकेटकीपर), नियाम मुइर (कर्णधार), नायमा शेख, अमेली बाल्डी, गॅब्रिएला फॉन्टेनला, रोझी स्पीडी, मैसी मॅसेरा, किर्स्टी मॅकॉल, मॉली बार्बर स्मिथ, लुसी फॉरेस्टर स्मिथ, चर्नाटे पार्क, मॉली बार्बोर स्मिथ, मॉरीन पार्क

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).