IND-W Beat SA-W: भारतीय महिला संघाचा साऊथ आफ्रिकेवर 10 विकेटने शानदार विजय, शेफाली वर्मा ठरली सामनाविर
सानिया आणि शुभा सतीश यांनी मिळून या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला कोणतीही अडचण आली नाही.
एकीकडे टीम इंडिया टी-20 विश्वचषक चॅम्पियन झाल्याचा जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे भारतीय महिला क्रिकेट संघानेही चाहत्यांना आनंदाची मोठी संधी दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीत विजय मिळवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी 10 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने पहिल्या डावात 603 धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 266 धावांत गारद झाला. (हेही वाचा - Shafali Verma Double Century: शेफाली वर्माने इतिहास रचला, भारतासाठी द्विशतक झळकावणारी ठरली दुसरी फलंदाज)
फॉलोऑन खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात चांगली झुंज देत स्कोअरबोर्डवर 373 धावा केल्या आणि अखेरीस टीम इंडियाला 37 धावांचे लक्ष्य मिळाले. सानिया आणि शुभा सतीश यांनी मिळून या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला कोणतीही अडचण आली नाही.
पाहा पोस्ट -
टीम इंडियाच्या विजयाची स्क्रिप्ट त्याच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी मिळून लिहिली होती, पहिल्या डावात शेफाली वर्माने फक्त 197 चेंडूत 205 धावा केल्या होत्या आणि स्मृती मानधनानेही आपल्या बॅटने 149 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात स्नेह राणाच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेला हादरवले. स्नेह राणाने 77 धावांत 8 बळी घेतले. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्जने 66 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरने 69 धावा आणि रिचा घोषने 86 धावा केल्या ज्यांचा टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा आहे.