India Tour of Australia Schedule PDF Download: भारत-ऑस्ट्रेलिया टी-20, वनडे आणि टेस्ट मालिकेचे संपूर्ण शेड्युल, स्थळांची माहिती जाणून घ्या

27 नोव्हेंबर पासून वनडे मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार दोन्ही संघात 3 सामन्यांच्या मर्यादित ओव्हरची मालिका आणि नंतर बहुप्रशिक्षित 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जाईल. जाणून घ्या संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक व मालिकेच्या स्थळांची माहिती. 

आरोन फिंच आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

India Tour of Australia Schedule PDF: आयपीएल 2020 नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Asutralia) द्विपक्षीय मालिकेसाठी सज्ज आहे. मार्च महिन्यांनंतर चाहत्यांच्या भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) पुन्हा निळ्या जर्सीत पाहण्याची संधी मिळणार आहे. 27 नोव्हेंबर पासून वनडे मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार दोन्ही संघात 3 सामन्यांच्या मर्यादित ओव्हरची मालिका आणि नंतर बहुप्रशिक्षित 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका (Border-Gavaskar Series) खेळली जाईल. या मालिकेचे दोन्ही संघांसाठी वेगळे महत्त्व आहे आणि विजयी होण्यासाठी ते कोणतीही कसर सोडणार नाही. कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरील ब्रेकनंतर भारताची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल, त्यामुळे ते दणक्यात पुनरागमन करू पाहत असतील. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ (Australian Team) 2018-19 मालिकेत झालेल्या पराभवाचा बदला घेऊ इच्छित असतील. 'त्या' दौऱ्यावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली होती. (भारताच्या 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे PDF स्वरूपात वेळापत्रक, स्थळांची माहिती विनामूल्य डाउनलोड करा)

भारतीय संघाच्या शेवटच्या दौऱ्याच्या सुखद आठवणी असल्या तरी यंदा त्यांच्यासमोर स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरच्या जोडीचे एक कठीण आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील दौऱ्यादरम्यान दोंघांवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात अली होती, पण आगामी मालिकेत ते या मालिकेचे वैशिष्ट्य ठरतील अशी कामगिरी करण्यासाठी दोघे उत्सुक असतील. तथापि, भारताकडे एक मजबूत संघ आहे आणि ते त्यांच्या मागील पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात असतील.

दरम्यान, आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंग दुखापत झालेल्या रोहित शर्माला मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून कर्णधार विराट कोहलीची पॅटर्निटी राजा मंजूर करण्यात आली आहे. अशा स्थितीत विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी मालिकेनंतर भारताला रावाना होईल. अ‍ॅडिलेड येथे खेळली जाणारी पहिला टेस्ट सामना पिंक-बॉलने खेळला जाईल जो की दोन्ही संघांमधील पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी आजवर खेळलेला एकही दिवस/रात्र कसोटी सामना गमावलेला नाही, त्यामुळे कोणत्या संघाला पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागते हे पाहणे औत्सुकतेचे उठरणार आहे.