India A vs India D, Duleep Trophy 2024 3rd Match Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत ड ने घेतली 222 धावांची भक्कम आघाडी; येथे पाहा स्कोअरकार्ड
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत अ संघाने 28.1 षटकात एक गडी गमावून 115 धावा केल्या आहे.
India A vs India D, Duleep Trophy 2024 Day 2 Stumps Scorecard: दुलीप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) चा तिसरा सामना 12 सप्टेंबरपासून भारत अ विरुद्ध भारत ड यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अनंतपूर येथील ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना जिंकून दोन्ही संघांना विजयाची चव चाखायची आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत अ संघाने 28.1 षटकात एक गडी गमावून 115 धावा केल्या आहे.
सलामीवीर प्रथम सिंग 59 धावा करून खेळत आहे. प्रथम सिंगशिवाय कर्णधार मयांक अग्रवालने 56 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारत अ संघाने 222 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने एक विकेट घेतली. (हे देखील वाचा: Shreyas Iyer Troll: सनग्लासेस घालून बॅटिंगला उतरलेला श्रेयस अय्यर झाला ट्रोल; शुन्यावर झाला बाद)
तत्पूर्वी, भारत ड संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील भारत अ ने दुलीप ट्रॉफी 2024 च्या फेरी -2 मध्ये भारत ड विरुद्ध खराब सुरुवात केली.
Stumps on Day 2!
A very good start for India A, they are 115/1.
Mayank Agarwal & Pratham Singh looked solid at the crease but Shreyas Iyer struck late in the day to dismiss Agarwal
India A lead by 222#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/m9YW0Hu10f pic.twitter.com/VekuJq7u15
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 13, 2024
पहिल्या डावात संपूर्ण भारत अ संघ 84.3 षटकात 290 धावा करत सर्वबाद झाला होता. भारत अ संघाकडून शम्स मुलानीने 89 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. शम्स मुलानी व्यतिरिक्त तनुष कोटियनने 53 धावा केल्या. भारत ड संघाकडून हर्षित राणाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हर्षित राणाशिवाय विदाथ कावरप्पा आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
त्याचवेळी, पहिल्या डावात संपूर्ण भारत ड संघ 52.1 षटकात केवळ 183 धावांवरच मर्यादित राहिला. इंडिया ड साठी देवदत्त पडिककलने सर्वाधिक 91 धावांची खेळी खेळली, पण देवदत्त पडिक्कल व्यतिरिक्त दुसरा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही. देवदत्त पडिक्कलशिवाय हर्षित राणाने 31 धावा केल्या. भारत अ संघाकडून खलील अहमद आणि आकिब खान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. खलील अहमद आणि आकिब खान यांच्याशिवाय प्रसीद कृष्णा, तनुष कोटियन आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2024 06:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

