IND vs SA: कोहलीच्या निशाण्यावर जयवर्धनेचा विक्रम, इतिहास रचण्यापासून फक्त 28 धावा दूर
भारतासाठी, त्याच्या फलंदाजांची विशेषत: विराट कोहलीची (Virat Kohli) कामगिरी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहलीसाठी आतापर्यंत ही स्पर्धा चांगलीच ठरली आहे. पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळल्यानंतर त्याने नेदरलँड्सविरुद्धही नाबाद अर्धशतक झळकावले.
टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) भारतीय क्रिकेट संघासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सुपर 12 टप्प्यातील गट 2 च्या सामन्यात त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) होईल. दोन्ही संघांमधील हा सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. येथील विजयी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याबरोबरच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करेल. भारतासाठी, त्याच्या फलंदाजांची विशेषत: विराट कोहलीची (Virat Kohli) कामगिरी खूप महत्त्वाची आहे. विराट कोहलीसाठी आतापर्यंत ही स्पर्धा चांगलीच ठरली आहे. पाकिस्तानविरुद्ध 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळल्यानंतर त्याने नेदरलँड्सविरुद्धही नाबाद अर्धशतक झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटकडून अशीच खेळी अपेक्षित आहे आणि यादरम्यान त्याला विश्वविक्रम करण्याचीही संधी असेल.
विराट विश्वविक्रमापासून 28 धावा दूर
माजी कर्णधार विराट कोहली श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धनेला मागे टाकून T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज होण्यापासून फक्त 28 धावा दूर आहे. विराटने टी-20 विश्वचषकाच्या 21 डावांमध्ये आतापर्यंत 989 धावा केल्या आहेत. 2012 मध्ये T20 विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केल्यापासून विराटने 89.90 च्या सरासरीने आणि 132.04 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 अर्धशतकेही झळकावली आहेत. (हे देखील वाचा: IND vs SA T20 WC 2022 Live Streaming Online: स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी उतरणार भारत, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना)
जयवर्धनेने केल्या आहेत सर्वाधिक धावा
विराटपेक्षा फक्त जयवर्धनेने जास्त धावा केल्या आहेत. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने 2007-14 दरम्यान 31 डावांमध्ये 39 च्या सरासरीने आणि 134.74 च्या स्ट्राईक रेटने 1016 धावा केल्या. या काळात जयवर्धनेने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2022 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

