IND vs SA 1st T20I Toss Update: दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज (8 नोव्हेंबर 2024) होणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथील किंग्समीड क्रिकेट मैदानावर होत आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्याचा टी-20 विश्वचषक विजेता आहे. या दोन्ही संघांची शेवटची गाठ 2024 च्या टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरीत होती आणि भारतीय संघाने शेवटच्या क्षणी विजय मिळवला. अशा स्थितीत भारताला हीच लय कायम ठेवायला आवडेल. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा बदला घ्यायचा आहे. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे, तर दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामकडे आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - IND vs SA 1st T20I Pitch Report: पहिल्या टी-20 सामन्यात कशी असेल खेळपट्टी? डर्बनमध्ये कोणाल मिळणार मदत गोलंदाज की फलंदाज? )
पाहा पोस्ट -
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिल्यास टीम इंडियाचा वरचष्मा दिसतो. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 27 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 15 सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग XI
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकिपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान