IND vs NZ WTC Final 2021: राखीव दिवसावर आज ICC घेईल निर्णय, भारत-न्यूझीलंड सामन्याचा असा लागू शकतो निकाल
साउथॅम्प्टन येथे पावसामुळे गमावलेला वेळ परत मिळवण्यासाठी राखीव दिवशी सामना खेळला जाईल की नाही याची आयसीसी मंगळवारी अधिकृतपणे घोषणा करेल. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (डब्ल्यूटीसी) भारत आणि न्यूझीलंडमधील खेळ पाऊस आणि खराब प्रकाशाने खराब केलं होता.
IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टन (Southampton) येथे पावसामुळे गमावलेला वेळ परत मिळवण्यासाठी राखीव दिवशी सामना खेळला जाईल की नाही याची आयसीसी (ICC)मंगळवारी अधिकृतपणे घोषणा करेल. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलमध्ये (डब्ल्यूटीसी) भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील खेळ पाऊस आणि खराब प्रकाशाने खराब केलं होता. पहिल्या दिवसाप्रमाणे चौथ्या दिवशी देखील एकही चेंडू न खेळता खेळ रद्द करण्यात आला. गेल्या दशकात पहिल्यांदा आयसीसीने कसोटी सामन्याचे दोन दिवस गमावले आहात. आता विराट कोहलीच्या टीम इंडिया (Team India) आणि केन विल्यमसनच्या ब्लॅककॅप्स (BlackCaps) संघातील विजेता मिळवण्यासाठी सहा सत्रे आणि 196 ओव्हरचा खेळ रंगणार आहे. (Southampton Weather Update for June 22: भारत-न्यूझीलंड चाहत्यांच्या उत्साहावर पुन्हा पावसाचे पाणी? पाहा काय सांगतो पाचव्या दिवसाच्या हवामानाचा अंदाज)
पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फेरल्यावर दुसर्या दिवशी 64.4 तर तर रविवार तिसऱ्या दिवशी 76.3 ओव्हरचा खेळ झाला. चौथ्या दिवशी देखील पावसामुळे खेळ खराब केला. त्यामुळे आता राखीव म्हणून ठेवलेला सहावा दिवस निश्चितपणे वापरला जाईल. सामना ड्रॉ किंवा अनिर्णित झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल. तसेच अंतिम दिवसाच्या नियमित दिवसांत हरवलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी एक राखीव दिवस देण्यात आला आहे. संपूर्ण पाच दिवसांच्या खेळाची खात्री करण्यासाठी राखीव दिन निश्चित केला गेला आहे आणि सामन्याच्या नियमित दिवसांत गमावलेल्या वेळेची भरपाई करता आली नाही तरच त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. आयसीसीच्या मते आरक्षित दिवसासाठी जास्तीत जास्त कालावधी किमान 330 मिनिटे असेल (किंवा 83 ओव्हर), सोबतच शेवटचा तास.
राखीव दिवसासाठी उपलब्ध अतिरिक्त वेळ परिच्छेद 8 नुसार सुरुवातीला 330 मिनिटे आणि ठरलेल्या खेळण्याच्या वेळेत फरक असेल. दरम्यान, पाचव्या दिवसाचा खेळ देखील पावसामुळे खराब होऊ शकतो. अॅक्यूवेदरच्या अहवालानुसार दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि पाऊस पडेल. दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु सर्वात मोठी चिंता कमी प्रकाशात होईल कारण तेव्हा ढगाळ वातावरण असेल. अद्याप चार दिवसाच्या खेळात केवळ 141.2 ओव्हरचा खेळ झाला आहे. भारताने पहिल्या डावात 217 धावा केल्या तर दुसरीकडे, किवी संघाने दोन विकेट्स गमावून 101 धावा केल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2021 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

