IND vs ENG 5th Test: मँचेस्टर टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या खेळण्यावर सस्पेन्स

इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेचा शेवट जवळ आला असून पाचवा आणि शेवटचा सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे.

IND vs ENG 5th Test: मँचेस्टर टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, ‘या’ दिग्गज खेळाडूंच्या खेळण्यावर सस्पेन्स
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 5th Test 2021: ओव्हलवर (The Oval) खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने (Team India) इंग्लंडचा (England) 157 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी अतुलनीय आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात पछाडत भारतीय संघातील (Indian Team) सर्व सदस्यांनी ओव्हल कसोटीत सर्वोत्तम कामगिरी केली आणि विजय खेचून आणला. आता मालिकेचा शेवट जवळ आला असून पाचवा आणि शेवटचा सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे. (ENGvsIND 5th Test: इंग्लंड संघात Jos Buttler आणि Jack Leach यांचा समावेश)

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान दोन्ही खेळाडू जखमी झाले होते. सलामीवीर रोहित शर्माला गुडघ्याला दुखापत झाली तर चेतेश्वर पुजाराला घोट्याला दुखापत झाली आहे. तसेच बीसीसीआयने अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे पाचव्या निर्णायक सामन्यात भारताच्या ओव्हल विजयात महत्वाची भूमिका बजावलेले हे दोघे स्टार फलंदाज खेळणार की नाही याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे दुखापतीमुळे दोघे खेळाडू चौथ्या डावात फिल्डिंगसाठी देखील मैदानात उतरले नव्हते. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा (127) आणि चेतेश्वर पुजारा (61) यांनी 153 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ज्यामुळे भारताला 466 धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावादरम्यान चेतेश्वर पुजाराच्या घोट्याला मुरड आली होती आणि फलंदाजी करताना त्याला पट्टी बांधून खेळावे लागले होते. दुसरीकडे, रोहित शर्माने सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान सांगितले की यावेळी त्याला बरे वाटत आहे.

दुसरीकडे, फिजिओने म्हटले आहे की प्रत्येक मिनिटाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि फार लांबचा विचार करण्याची गरज नाही. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने जबरदस्त शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले होते. परदेशी भूमीवर रोहित शर्माचे हे पहिले कसोटी शतक होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2021 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).