IND vs ENG 4th T20I 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवर प्रसारण कसे पहावे ते घ्या जाणून

भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत, जे भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी20 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल.

IND vs ENG 4th T20I 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी20 सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? दूरदर्शन टीव्ही चॅनेलवर प्रसारण कसे पहावे ते घ्या जाणून
भारत vs इंग्लंड (Photo Credit: X Formerly Twitter)

India National Cricket Team vs England National Cricket Team:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) उद्या म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळला जाईल. सामन्याला संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.  प्रेक्षक लाईव्ह टेलिव्हिजनवर या रोमांचक मालिकेचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, डिस्ने+ हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी20 2025 सामन्याचे प्रसारण दूरदर्शन नेटवर्क (DD स्पोर्ट्स किंवा DD नॅशनल) वर डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल का? यासंबंधी तपशीलांसाठी तुम्ही खाली स्क्रोल करू शकता.  (हेही वाचा  -  India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पहा आकडेवारी)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ही मालिका उत्साहाने भरलेली आहे, जरी ती अपेक्षेप्रमाणे उच्च धावसंख्या असलेली नव्हती. तीन सामन्यांनंतर, भारत 2-1 ने पुढे आहे आणि गोलंदाजांनी सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारताने चार फिरकी गोलंदाजांना आजमावले आहे, तर इंग्लंडने त्यांच्या वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना त्रास दिला आहे. मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर पॉवरप्लेमध्ये आक्रमक गोलंदाजी करत आहेत, तर ब्रायडन कार्स आणि जेमी ओव्हरटन मधल्या षटकांमध्ये हार्ड लेन्थ गोलंदाजी करत आहेत.

पाहा पोस्ट -

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी20 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का?

भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत, जे भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी20 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल. तथापि, डीडी स्पोर्ट्स 1.0 वर भारताच्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण फक्त डीडी फ्री डिश आणि इतर डीटीटी (डिजिटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. डीडी स्पोर्ट्सवर भारतातील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केबल टीव्ही किंवा एअरटेल डिजिटल टीव्ही, टाटा प्ले, डिश टीव्ही इत्यादी डीटीएच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नसेल.

 

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).