IND vs AUS Semi-Final: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना काही तासांत सुरू होईल. टीम इंडिया दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने खेळत आहे. मात्र, आता मोठ्या सामन्याआधी खेळपट्टीच बदलली आहे.

IND vs AUS Semi-Final: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ?
Photo Credit- X

India vs Australia Semi Final, Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा हंगाम बघता बघता शेवटच्या टप्प्यावर आली आहे. आज 4 मार्च रोजी अ गटामधील पहिली उपांत्य फेरी रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील सामना काही तासांत सुरू होईल. टीम इंडिया दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने खेळत आहे. मात्र, आता मोठ्या सामन्याआधी खेळपट्टीच बदलली आहे. (हेही वाचा:Jos Buttler: 'हे खूप दुःखद'; इंग्लंडचे कर्णधारपद सोडल्यानंतर जोस बटलरकडून भावनिक पोस्ट शेअर)

टीम इंडियाला फायदा मिळाला?

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी2025 मध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव करत सलग तीन विजय मिळवले आहेत. मात्र दरम्यान, भारताला एकाच खेळपट्टीवर खेळण्याचा फायदा झाला अशी टीका झाली. सर्वात आधी पाकिस्तानने टीका केली. पाकिस्तानने भारताला एकाच खेळपट्टीवर सतत सराव आणि खेळण्याचा फायदा सांगितला. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानेही भारताच्या विजयाचे श्रेय खेळपट्टीच्या फायद्याला दिले. मात्र या टीकेला आता उपांत्य फेरीत उत्तर मिळणार आहे.

नवीन खेळपट्टी तयार केली

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. दुबईच्या मैदानातच नव्या खेळपट्टीवर दनही संघांमधील महाजंग होणार आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलिया यावेळी भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2025 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).