IND vs AUS 3rd Test Day 4 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात आज सिडनी टेस्टच्या चौथ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. SCG वर चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय चाहते लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल.
IND vs AUS 3rd Test Day 4 Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात (Australia Cricket Team) आज सिडनी टेस्टच्या (Sydney Test) चौथ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया 244 धावांपर्यंतच मजल मारू शकली. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर कांगारू संघाने 96 धावांची आघाडी घेतली आणि दिवसाखेर ती 197 धावांपर्यंत वाढवली. आता यजमान संघ चौथ्या दिवशी आक्रामक फलंदाजी करत मोठी आघाडी घेण्याच्या निर्धारित असेल. SCG वर चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 4:30 वाजता खेळ सुरु होईल. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND Vs AUS: भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे रविंद्र जाडेजा संघाबाहेर)
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत 131 धावा केल्या, तर भारताकडून फलंदाजी करताना शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना वगळता अन्य खेळाडू चाळीशी आकडा स्पर्श करू शकले नाही. शिवाय, पुजाराने कांगारू गोलंदाजांना स्वतःवर वर्चस्व गाजवू दिले आणि आपल्या टेस्ट करिअरमधील सर्वात मंद अर्धशतक ठोकले. पुजाराने 174 चेंडूंचा सामना करत पन्नाशीचा आकडा गाठला. भारताच्या निराशाजनक फलंदाजीनंतर आता गोलंदाजांवर चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे विशाल आव्हान असेल.
पहा भारत-ऑस्ट्रेलियाचा SCG मधील प्लेइंग इलेव्हन
भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन-विकेटकीपर), डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2021 04:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

