ICC Cricket World Cup 2019: आज टीम इंडियाची खरी परीक्षा; फायनलचे दावेदार असणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघासोबत लढत
आज आईसीसी वर्ल्डकप 2019 मधील सर्वात बलाढ्य अशा दोन संघांमध्ये लंडनमधील ओव्हल ग्राऊंडवर सामना रंगणार आहे.
IND vs AUS, ICC Cricket World Cup 2019: आज (9 जून) आईसीसी वर्ल्डकप 2019 मधील सर्वात बलाढ्य अशा दोन संघांमध्ये लंडनमधील ओव्हल ग्राऊंडवर (Oval Cricket Ground) सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या आज रंगणाऱ्या सामन्यात टीम इंडियाची खरी परीक्षा आहे. वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा दुसराच सामना असून 5 जून रोजी झालेल्या दक्षिण ऑफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली होती. तर ऑस्ट्रेलिया संघाचा हा तिसरा सामना असून पहिले दोन सामने त्यांनी खिशात घातले आहेत.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने 5 वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. भारताला केवळ दोनदा विश्वचषक आपल्या नावे करण्यात यश आले आहे. त्यामुळे आपले आव्हान टिकवण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील. अनेक क्रिकेट तज्ञांनुसार, भारत, ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचतील. तर तज्ञांच्या या म्हणण्यानुसार हा फायनलचा सराव सामनाही असू शकतो. (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)
अशा अनेक शक्यता असल्या तरी फायनलचे दावेदार असणारा ऑस्ट्रेलिया संघ तगडा आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर टीम इंडिया आपले आव्हान टिकवू शकते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
असे असतील संघ:
भारत: विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, शिखर धवन, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, रोहित शर्मा, कुलदीप यादव.
आस्ट्रेलिया: एरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडार्फ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), नाथन कल्टर नाइल, पॅट कमिंस, उस्मान ख्वाजा, नाथन लॉयन, शॉन मार्श, ग्लॅन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वार्नर, एडम जाम्पा.