ICC Awards 2024 Winners List: सर्वोत्तम क्रिकेटपटूंपासून ते सर्वोत्तम संघांपर्यंत; आयसीसी पुरस्कारांची संपूर्ण यादी पहा
जसप्रीत बुमराह याला 2024 चा सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तर, 2024 ची सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान स्मृती मानधनाला मिळाला आहे.
ICC Awards 2024 Winners List: आयसीसीने 2024 सालासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कारांची घोषणा केली. आयसीसीने तिन्ही फॉरमॅटमध्ये 12 वैयक्तिक पुरस्कार आणि पाच सर्वोत्तम संघांची घोषणा केली आहे. आयसीसी पुरस्कार 2024 हे एकूण 13 श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत. ज्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय, एकदिवसीय, कसोटी आणि सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार आणि इतर पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली.
2024 ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू: अमेलिया केर
2024 चा सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू: जसप्रीत बुमराह
2024 ची सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू: स्मृती मानधना
2024 चा सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय क्रिकेटपटू: अझमतुल्लाह उमरझाई
2024 ची सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू: अॅनेरी डिर्कसेन
2024 चा सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू: कामिंदू मेंडिस
आयसीसी महिला असोसिएट क्रिकेटपटू ऑफ द इयर: ईशा ओझा
आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम असोसिएट क्रिकेटपटू: जेरार्ड इरास्मस
आयसीसी वर्षातील सर्वोत्तम पंच: रिचर्ड इलिंगवर्थ
2024 चा सर्वोत्तम टी 20 क्रिकेटपटू: अर्शदीप सिंग
आयसीसी टी 20 आय पुरुष संघ 2024: रोहित शर्मा (कर्णधार) (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), फिल साल्ट (इंग्लंड), बाबर आझम (पाकिस्तान), निकोलस पूरन (यष्टिरक्षक), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), हार्दिक पंड्या (भारत), रशीद खान (अफगाणिस्तान), वानिन्दु हसरंगा (श्रीलंका), जसप्रीत बुमराह (भारत) आणि अर्शदीप सिंग (भारत).
आयसीसी महिला टी-20 संघ 2024: एल वोल्वार्ड (कर्णधार) (दक्षिण आफ्रिका), मॅरिझाने कॅप (दक्षिण आफ्रिका), स्मृती मानधना (भारत), रिचा घोष (यष्टीरक्षक) (भारत), दीप्ती शर्मा (भारत); चामारी अटापट्टू (श्रीलंका); हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज); नॅट सेवेर्ड-ब्रंट (इंग्लंड); मेली कार (ऑस्ट्रेलिया), ओर्ला प्रेंडरगास्ट (आयर्लंड) आणि सादिया इक्बाल (पाकिस्तान).
आयसीसी 2024चा कसोटी संघ: पॅट कमिन्स (कर्णधार) (ऑस्ट्रेलिया), यशस्वी जयस्वाल (भारत), बेन डकेट (इंग्लंड), केन विल्यमसन (न्यूझीलंड), जो रूट (इंग्लंड), हॅरी ब्रूक (इंग्लंड), कामिंदू मेंडिस. (श्रीलंका), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक) (इंग्लंड), रवींद्र जडेजा (भारत), मॅट हेन्री (न्यूझीलंड), जसप्रीत बुमराह (भारत).
2024 चा आयसीसी महिला एकदिवसीय संघ: स्मृती मानधना (भारत), एल वोल्वार्ड (कर्णधार) (दक्षिण आफ्रिका), चामारी अटापट्टू (श्रीलंका), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), मॅरिझाने कॅप (दक्षिण आफ्रिका), अॅशले गार्डनर ( ऑस्ट्रेलिया), अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया), एमी जोन्स (यष्टीरक्षक) (इंग्लंड), दीप्ती शर्मा (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), केट क्रॉस (इंग्लंड).
2024 चा आयसीसी पुरुष एकदिवसीय संघ: चारिथ असलंका (कर्णधार) (श्रीलंका), सॅम अयुब (पाकिस्तान), रहमानउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान), पथुम निस्सांका (श्रीलंका), कुसल मेंडिस (यष्टीरक्षक) (श्रीलंका), शेरफेन रुदरफोर्ड (वेस्ट इंडिज), अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान), वानिन्दु हसरंगा (श्रीलंका), शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), हरिस रौफ (पाकिस्तान), एएम गझनफर (अफगाणिस्तान).
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2025 08:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

