वेस्ट इंडीज संघाचा दारूण पराभाव केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंकडून असा आनंद साजरा; रविचंद्रन अश्विन आश्चर्यचकीत
सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारतीय संघाने उत्तम कामगिरी करुन चाहत्यांचे मन जिंकले आहेत. सोमवारी भारतीय संघाने कसोटी सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाचा दारुण पराभव केला आहे. यानंतर भारतीय संघातील काही खेळाडू समुद्रकिनारी मजा-मस्ती करायला गेले होते. त्यावेळी या खेळाडूंनी एक फोटो टिपले. अश्वीनने तो फोटो त्याच्या ट्विटर अकांउटवर शेअर केला आहे. तसेच त्यावेळी असलेले संदुर दृश्यातून मिळालेला अनुभव त्याने पोस्ट केला आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघ (Indian Criket Team) वेस्टइंडीज (West Indies) दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारतीय संघाने उत्तम कामगिरी करुन चाहत्यांचे मन जिंकले आहेत. सोमवारी भारतीय संघाने कसोटी सामन्यात वेस्टइंडीजच्या संघाचा दारुण पराभव केला आहे. यानंतर भारतीय संघातील काही खेळाडू समुद्रकिनारी मजा-मस्ती करायला गेले होते. त्यावेळी या खेळाडूंनी एक फोटो टिपले. अश्वीनने तो फोटो त्याच्या ट्विटर अकांउटवर शेअर केला आहे. तसेच त्यावेळी असलेले संदुर दृश्यातून मिळालेला अनुभव त्याने पोस्ट केला आहे.
भारतीय संघाने ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. पहिल्या सामन्याच्या सुरुवातीला अनेक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघ निवड समितीवर प्रश्न निर्माण केले होते. परंतु, भारतीय संघाच्या या मोठ्या विजयानंतर या प्रश्नांना पूर्णविराम लागला आहे. पहिल्या कसोटीत विजय दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) , के. एल राहुल (K.L. Rahul), मयंक आग्रवाल (Mayank Agrawal) आणि आर. अश्वीन ( Ravichandran Ashwin) हे समुद्रकिनारी मज्जा करायला गेले होते . दरम्यान त्यांनी एक फोटो काढला आहे. त्या फोटोवर अश्वीनने अवस्मरणीय दृश्य असल्याचे ट्वीट केले आहे. हे देखील वाचा- Ashes 2019: बेन स्टोक्स याच्या धमाकेदार खेळीने तब्बल 96 वर्षांनंतर इंग्लंडने नोंदवला असा पराक्रम!
Seaside plus sunset is a deadly combination👌 pic.twitter.com/u7YpSQR9db
— Ashwin Ravichandran (@ashwinravi99) August 27, 2019
भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाला विरोधात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात चांगले प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाने अशीच कामगिरी करावे, असे चाहत्यांना वाटत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2019 09:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

